ETV Bharat / bharat

Dalits from a Bharatpur : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत मारहाण; सहा गावांतील दलितांचे स्थलांतरण सुरू

मंगळवारी सुमारे 300 जण आपले सामान आणि जनावरे घेऊन भरतपूर जिल्हाधिकारी ( Bharatpur district collectors office ) कार्यालयात पोहोचले. आंबेडकर भवनातील जिल्हाधिकारी ( District Collectors Office at Ambedkar Bhavan ) कार्यालयासमोर समाजातील शेकडो लोकांनी लहान मुले आणि पाळीव प्राण्यांसह तळ ठोकला होता. दुपारी चारच्या सुमारास जिल्हाधिकारी आलोक रंजन ( District Collector Alok Ranjan ) यांनी समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.

सहा गावांतील दलितांचे स्थलांतरण सुरू
सहा गावांतील दलितांचे स्थलांतरण सुरू
author img

By

Published : Apr 20, 2022, 12:53 PM IST

जयपूर ( राजस्थान ) - भरतपूर जिल्ह्यातील कुम्हेर क्षेत्रातील गावांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत गोंधळ आणि मारहाणीची घटना झाली आहे. त्यामुळे सहा गावातील दलित समाजाने मंगळवारी गावातून स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

मंगळवारी सुमारे 300 जण आपले सामान आणि जनावरे घेऊन भरतपूर जिल्हाधिकारी ( Bharatpur district collectors office ) कार्यालयात पोहोचले. आंबेडकर भवनातील जिल्हाधिकारी ( District Collectors Office at Ambedkar Bhavan ) कार्यालयासमोर समाजातील शेकडो लोकांनी लहान मुले आणि पाळीव प्राण्यांसह तळ ठोकला होता. दुपारी चारच्या सुमारास जिल्हाधिकारी आलोक रंजन ( District Collector Alok Ranjan ) यांनी समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. सोबतच गाव सोडून गेलेल्या लोकांना नाश्त्याची सोय करून ठोस कारवाईचे आश्वासन दिले. यानंतर गावकऱ्यांना बसमध्ये बसवून त्यांच्या गावी पाठवण्यात आले आहे.

घरामध्ये घुसून गुंडांची मारहाण- मारहाण दलित समाजातील लोकांनी सांगितले की, गावातील घरामध्ये गुंड घुसून मारहाण करत आहेत. त्यामुळे त्यांना गाव सोडून स्थलांतर करावे लागले आहे. समाजाच्या या पाऊलामुळे प्रशासनही सज्ज झाले आहे. समाजातील लोकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले. समाजातील लोकांची दिशाभूल करून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

सहा गावांतील दलितांचे स्थलांतरण सुरू

जिल्हाधिकार्‍यांनी दलितांची काढली समजूत - या संपूर्ण प्रकरणाबाबत जिल्हाधिकारी आलोक रंजन यांनी सांगितले की, घटनेनंतर लगेचच या प्रकरणात ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. गाव सोडल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेल्या लोकांशी जिल्हाधिकारी आलोक रंजन यांनी संवाद साधला. याप्रकरणी ठोस कारवाईचे आश्वासन देण्यात आले आहे. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व ग्रामस्थांना समजावून सांगून त्यांना बसमध्ये बसवून गावी रवाना केले. जिल्हाधिकारी आलोक रंजन म्हणाले की, काही लोक दलित समाजातील लोकांची दिशाभूल करत आहेत. अशा काही लोकांची ओळख पटली आहे. त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल.

काय आहे प्रकरण? - 14 एप्रिल रोजी डॉ. भीमराव आंबेडकर जयंतीनिमित्त भरतपूर जिल्ह्यातील कुम्हेर भागातील साह गावात जाटव समाजाचे लोक मिरवणूक काढत होते. शोभा यात्रेवर गावातील दबंग लोकांनी दगडफेक केली. उभय पक्षांमध्ये ( ruckus on Ambedkar Jayanti ) मारामारी झाली. यानंतर आंबेडकर जयंतीच्या ठिकाणी लोक तंबू ठोकून जमले. तिथे काही लोकांनी पोहोचून तंबू पेटवला. या संपूर्ण प्रकरणाबाबत दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध पोलिसात एफआयआर दाखल केला. या संपूर्ण प्रकरणी २९ जणांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहवालाची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली.

हेही वाचा-Ink Throw RTO Officer : आंबेडकर जयंती साजरी केली नाही; अधिकाऱ्याला फासले काळे

हेही वाचा-dalit student beat up : युपीत दलित विद्यार्थ्याला 6 गुंडांकडून मारहाण; पायही चाटायला लावले!

हेही वाचा-मिरवणुकीतून तडीपार व्यक्तीला ताब्यात घेताना पोलिसांसोबत झटापट; गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.