ETV Bharat / bharat

Mocha Cyclone: मोचा चक्रीवादळ! बांगलादेशासह म्यानमारच्या किनारपट्टीवर दाखल; ईटीव्हीचा खास रिपोर्ट - म्यानमारच्या किनारपट्टीवर मोचा चक्रीवादळ

भारतीय हवामान विभागाने ‘मोचा’ चक्रीवादळाच्या संदर्भात अलर्ट जारी केला आहे. या वादळाचा सर्वात जास्त परिणाम अंदमान निकोबार बेटांवर दिसून येईल असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत ईटीव्ही भारतना अधिकाऱ्यांशीही खास संवाद साधला आहे.

cyclone mocha
Mocha
author img

By

Published : May 8, 2023, 8:09 PM IST

ईटीव्हीचा खास रिपोर्ट

नवी दिल्ली : यावर्षीच्या पहिल्या चक्री वादळात 'मोचा' वादळाची सुरूवात झाली आहे. याबाबत भारतीय हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. 2022 मध्ये असानीसारखा कहर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, अंदमान-निकोबारमध्ये ८ मे रोजी पाऊस पडेल. यासोबतच इतर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या दरम्यान ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. त्याच वेळी, 10 मे रोजी वाऱ्याचा वेग ताशी 80 ते 90 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. या वादळाचा प्रभाव अंदमान निकोबार बेटांवर अधिक दिसून येईल असाही अंदाज वर्तवला आहे.

पर्यटकांना सतर्कतेचा इशारा : IMD ने आधीच मच्छिमार, लहान जहाजे, बोटी आणि पर्यटकांना आग्नेय बंगालच्या उपसागरापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय 8 ते 11 मे पर्यंत पर्यटन, शिपिंग आणि इतर कामांचे नियमन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर तेथे येणाऱ्या पर्यटकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, मच्छीमारांना समुद्र किनाऱ्यापासून दूर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  • A low pressure area has formed over SE BOB & adjoining South Andaman Sea at 0830 IST of today. Likely to intensify into a depression on 9th May over the same region and further into a CS over SE BOB and adjoining areas of EC BOB and Andaman Sea on 10th May. pic.twitter.com/aqkvaRDjpx

    — India Meteorological Department (@Indiametdept) May 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

वादळ बांगलादेश आणि म्यानमारच्या किनारपट्टीवर : आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, १२ मे रोजी हे वादळ पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार बेटांवर पोहोचेल. सध्याची परिस्थिती पाहता हे चक्रीवादळ भारतातील दक्षिण किनारपट्टी, ओडिशा आणि आग्नेय गंगा पश्चिम बंगालमधून पुढे जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर हे वादळ बांगलादेश आणि म्यानमारच्या किनारपट्टीवर पोहोचेल असेही सांगण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहा : सध्या आम्ही सातत्याने लक्ष ठेवत असल्याचे हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानंतर अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेऊन तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. ओडिशा तसेच पश्चिम बंगालमधील सर्व जिल्ह्यांना अलर्टवर ठेवण्यात आले असून, राज्यातील एसडीआरएफ आणि एनडीआरएफला आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : सुप्रिम कोर्टाने मणिपूर हिंसाचाराचा केंद्रासह राज्य सरकारला अहवाल मागवला, बाधितांच्या पुनर्वसनाच्याही दिल्या सुचना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.