ETV Bharat / bharat

Cyclone Biparjoy: पुढील 36 तासात आणखी तीव्र होणार बिपरजॉय चक्रीवादळ, महाराष्ट्रासह या 4 राज्यांना सतर्कतेचा इशारा - अरबी समुद्रातील चक्रीवादळ बिपरजॉय

आयएमडीनुसार, अरबी समुद्रातील चक्रीवादळ बिपरजॉय आणखी तीव्र होणार आहे. मुंबईच्या दक्षिणेस सुमारे 790 किमी, पोरबंदरपासून 810 किमी आणि कराचीपासून 1100 किमी अंतरावर आहे. पुढील 36 तासांत चक्रीवादळाची तीव्रता वाढणार असल्याचे आयएमडीने म्हटले आहे.

Cyclone Biparjoy
बिपरजॉय चक्रीवादळ
author img

By

Published : Jun 10, 2023, 9:29 AM IST

मुंबई : भारतीय हवामानशास्त्र विभागाने चक्रीवादळ बिपरजॉय पुढील 36 तासात आणखी तीव्र होईल अशी शक्यता वर्तवली आहे. हे चक्रीवादळ शनिवारी ईशान्येकडे सरकणार आहे. IMD ने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, बिपरजॉय हे तीव्र चक्रीवादळ 9 जून रोजी 23:30 वाजता पूर्व-मध्य अरबी समुद्रात पोहोचले. हे चक्रीवादळ 2 दिवसांत उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने सरकणार आहे. या पार्श्वभूमीवर मच्छिमारांनी अरबी समुद्रात जाऊ नये,अशी सूचना हवामान खात्याने दिली आहे.

या चार राज्यंमध्ये प्रभाव दिसरणार : बिपरजॉयचा प्रभाव चार राज्यांमध्ये दिसण्याची शक्यता आहे. दक्षिण अरबी समुद्राच्या जवळपासच्या भागात 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या चार राज्यांमध्ये चक्रीवादळाचे परिणाम दिसणार असून दक्षता घेण्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपच्या किनारपट्टीपासून मच्छिमारांना दूर राहण्याचा सांगण्यात आले आहे.

समुद्रकिनारा पर्यटकांसाठी १४ जूनपर्यंत बंद : बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गुजरातमधील वलसाडला लागून असलेल्या अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर उंच लाटा उसळल्या आहेत. खबरदारी म्हणून तेथील समुद्रकिनारे हे १४ जूनपर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. वलसाडचे तहसीलदार टीसी पटेल यांनी सांगितले की, मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. जे मासेमारी करणारे समुद्रात गेले होते त्यांना परत बोलावण्यात आले आहे. दरम्यान गरज वाटली तर समुद्रकिनारी असलेल्या गावातील लोकांना स्थलांतरित केले जाईल. त्यांच्यासाठी निवारागृहे तयार करण्यात आली आहेत. तेथील समुद्रकिनारा पर्यटकांसाठी १४ जूनपर्यंत बंद करण्यात आली आहेत.

मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यात पाऊस : मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांत आणि त्याच्या शेजारील ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत पावसाच्या शक्यतेचा इशारा देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा पाऊस बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे होणार आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईतही काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल. आयएमडीने सोमवारी सकाळपर्यंत पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

देशातील इतर राज्यांनाही याचा फटका बसणार आहे : तत्पूर्वी, येत्या ३६ तासांत चक्रीवादळ बिपराजॉयची तीव्रता वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने, हवामान खात्याने केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपच्या किनार्‍यालगतच्या समुद्रात मच्छिमारांना न जाण्याचा सल्ला दिला आहे. केरळमधील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये तिरुवनंतपुरम, कोल्लम, पठाणमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम, इडुक्की, कोझिकोड आणि कन्नूर यांचा समावेश आहे.

हेही वाचा-

  1. Monsoon Update : म्हणून होतोय मान्सूनला उशीर..महाराष्ट्रात 'या' दिवशी दाखल होणार
  2. Cyclone Biperjoy: 'बिपरजॉय’ चक्रीवादळाचे तीव्र वादळात रूपांतर; महाराष्ट्रातील मान्सूनवर काय होणार परिणाम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.