ETV Bharat / bharat

CWG 2022 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने रचला इतिहास; 200 सुवर्णपदके जिंकणारा ठरला चौथा देश - कॉमनवेल्थ गेम्स लेटेस्ट न्यूज

कॉमनवेल्थ गेम्समधील ( Commonwealth Games medals ) एकूण सुवर्णपदकांच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया (1003 सुवर्णपदके) अव्वल आहे, तर इंग्लंड (773) दुसऱ्या आणि कॅनडा (510) तिसऱ्या स्थानावर आहे.

commonwealth games
राष्ट्रकुल क्रीडा
author img

By

Published : Aug 9, 2022, 1:34 PM IST

बर्मिंगहॅम: राष्ट्रकुल क्रीडा 2022 ( CWG 2022 )च्या स्पर्धेत भारताने शानदार कामगिरी केली आहे. भारताने यावेळी एकूण 61 पदके जिंकली. यामध्ये 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदकांचा समावेश आहे. त्याचवेळी, बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पीव्ही सिंधूच्या विजयासह, भारताने सोमवारी राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासातील 200 वे सुवर्णपदक जिंकले.

बर्मिंगहॅम गेम्समध्ये, भारताने 22 सुवर्णपदके जिंकून एकूण सुवर्णपदकांची संख्या 203 वर पोहोचली ( India's gold medal tally is 203 ). बॅडमिंटन पुरुष एकेरीत सिंधूच्या पाठोपाठ लक्ष्य सेन, पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग सेन या जोडीने सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर अचंता शरथ कमलने टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.

कॉमनवेल्थ गेम्समधील ( commonwealth games medal ) एकूण सुवर्णपदकांच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया (1003 सुवर्णपदके) अव्वल, तर इंग्लंड (773) दुसऱ्या आणि कॅनडा (510) तिसऱ्या स्थानावर आहे. 1958 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पहिले सुवर्ण जिंकले होते. दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांनी हे सुवर्ण जिंकले होते. तेव्हापासून भारताने प्रत्येक राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे (1962 आणि 1986 मध्ये भाग घेतला नाही). या बाबतीत, 2010 मध्ये दिल्लीतील कॉमनवेल्थ गेम्स भारतासाठी सर्वात यशस्वी ठरले, ज्यामध्ये 38 सुवर्णपदके जिंकली.

हेही वाचा - CWG 2022 Closing Ceremony : कॉमनवेल्थ गेम्स 2022चा समापन सोहळा 'असा' पडला पार, पहा फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.