नवी दिल्ली - आरटी-पीसीआर चाचणीद्वारे एखाद्या व्यक्तीमध्ये कोविडचा विषाणू आहे किंवा नाही याचे निदान केले जाते. यासाठी घशातील आणि नाकातील स्वॅबची चाचणी केली जाते. मानवी पेशींमध्ये कोरोनाचा विषाणू आहे किंवा नाही याचे अचूक निदान करण्यासाठी ही चाचणी परिणामकारक आहे. अनेक राज्यात आरटीपीसीआर चाचणी सरकारी रुग्णालयांत मोफत आहे. मात्र, खासगी प्रयोगशाळेत चाचणी करण्यासाठी पैसे मोजावे लागतात.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) कोरोना चाचणीचे दर ठरविण्याचे स्वातंत्र्य राज्य सरकारांना दिले आहे. देशात कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर सुरुवातीला चाचणीचे दर जास्त होते. मात्र, नंतर परदेशातून कोविड चाचणीचे कीट मागविल्याने आणि देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढल्यानंतर अनेक राज्यांनी चाचणीचे दर कमी केले. सुरुवातीला मोठ्या प्रमाणात चाचण्या घेण्याचे आव्हान सरकार पुढे होते. त्यामुळे लवकर निदान होऊन उपचार करणे शक्य होत असे तसेच एखाद्या परिसरातील कोरोनाचा प्रसार लवकर आटोक्यात आणता येई.
कोरोना चाचणीचे विविध राज्यातील दर
राज्य | आरटी-पीसीआर चाचणीचा दर (रुपयांमध्ये) |
आंध्र प्रदेश | १६०० |
आसाम | २२०० |
बिहार | ८०० |
छत्तीसगड | १६०० |
दिल्ली | ८०० |
गोवा | ४५०० |
गुजरात | ८०० |
हरयाणा | ९०० |
झारखंड | १०५० |
कर्नाटक | १२०० |
केरळ | २१०० |
मध्यप्रदेश | १२०० |
महाराष्ट्र | ९८० |
ओडिशा | ४०० |
पंजाब | १६०० |
राजस्थान | ८०० |
तामिळनाडू | १५०० ते २००० |
तेलंगणा | ८५० |
उत्तर प्रदेश | ७०० |
उत्तराखंड | ९०० |
पश्चिम बंगाल | १५०० |