ETV Bharat / bharat

घसरणीनंतर बिटकॉइन पुन्हा १६ लाखांवर.. इतर क्रिप्टोकरन्सीचे दरही वधारले.. - आजच्या क्रिप्टोकरन्सी किमती

गेल्या २४ तासांत बिटकॉइनच्या दरांमध्ये ४ हजाराने घट झाली ( Todays Bitcoin Rate ) आहे. गेल्या दोन महिन्यापासून बिटकॉइनच्या किमतीत घसरण सुरु आहे. त्यामुळे बिटकॉइनच्या गुंतवणूकदारांची चिंता पुन्हा वाढली आहे. बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १६ लाख ४५ हजार ७१५ रुपये इतकी आहे.

CRYPTOCURRENCY PRICES TODAY 24 JUNE 2022
आजच्या क्रिप्टोकरन्सी किमती
author img

By

Published : Jun 24, 2022, 7:12 AM IST

मुंबई : बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात बिटकॉइनची किंमत जवळपास ६ लाखांनी घसरली होती. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना एकाच दिवसात अब्जावधींचा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १६ लाख ४५ हजार ७१५ रुपये इतकी आहे.

आजचा बिटकॉइनचा दर

आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात २१ हजार ११३ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १६ लाख ४५ हजार ७१५ रुपये इतका आहे.

आजचा इथेरिअम कॉईनचा दर

आज इथेरिअम कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १ हजार ०५० डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १ लाख ४७ हजार ५५० रुपये इतका आहे.

आजचा डोज कॉईनचा दर

आज डोज कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ०.०६५ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ५.०७ रुपये इतका आहे.

हेही वाचा : Gold Rates Today : सोने- चांदीचे दर उतरले.. १० ग्रॅम सोन्याच्या दरात 'इतकी' घट.. पहा आजचे देशभरातील दर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.