मुंबई : बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्समध्ये आणखी घट झाली आहे. सलग तेरा आठवडे नकारात्मक परतावा अनुभवल्यानंतर, या आठवड्यातही क्रिप्टो व्यापारी अजूनही जोखीम न घेण्याच्या मोडमध्ये आहेत. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. त्यातच आज १.१० टक्क्यांनी बिटकॉइनच्या किमतीत घट झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
आजचा बिटकॉइनचा दर
आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात २९ हजार ७५२ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात २३ लाख १७ हजार ५३८ रुपये इतका आहे.
आजचा इथेरिअम कॉईनचा दर
आज इथेरिअम कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १ हजार ७३० डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १ लाख ३७ हजार ७३७ रुपये इतका आहे.
आजचा डोज कॉईनचा दर
आज डोज कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ०.०७९ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ६.१२ रुपये इतका आहे.