ETV Bharat / bharat

CRPF jawan missing: जम्मू-काश्मीर येथील CRPF जवान पठानकोट येथून बेपत्ता - CRPF चा जवान पठानकोट येथून बेपत्ता

मूळचा रामबन (जम्मू आणि काश्मीर) येथील CRPF जवान पंजाबमधील पठानकोट येथून बेपत्ता आहे (CRPF jawan missing from pathankot). जवान सध्या उत्तराखंडमध्ये तैनात होता.

CRPF जवान
CRPF jawan
author img

By

Published : Sep 29, 2022, 1:01 PM IST

रामबन (जम्मू आणि काश्मीर): मूळचा रामबन येथील मात्र सध्या उत्तराखंडमध्ये तैनात असलेल्या CRPF चा जवान पंजाबमधील पठानकोट येथून बेपत्ता आहे (CRPF jawan missing from pathankot). बेपत्ता जवानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या मोबाईलशी संपर्क होऊ शकलेला नाही आहे. कुटुंबीयांनी त्याच्या मित्रांशी संपर्क साधला मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही.

घरी जाण्यासाठी घेतली होती रजा: जवानाने जम्मू-काश्मीर मधील आपले मूळ गाव रामबनला भेट देण्यासाठी रजा घेतली होती. बेपत्ता जवान वसीम अफजलच्या कुटुंबीयांनी स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. वसीमचा भाऊ मुदस्सर अहमद म्हणाला की, "माझा भाऊ उत्तराखंडहून विमानाने दिल्ली पर्यंत आला आणि नंतर बसने घरी येण्यासाठी निघाला होता. मात्र पठाणकोटला पोहोचल्यानंतर आमचा त्याच्याशी संपर्क तुटला," दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून बेपत्ता जवानाच्या मोबाईल फोनचे शेवटचे लोकेशन शोधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.