ETV Bharat / bharat

Crime News : मुंबईत इमारत प्रकल्प मिळवून देण्याच्या नावाखाली व्यावसायिकाची १२७ कोटी रुपयांची फसवणूक

Crime News : हरियाणातील सोनीपतमध्ये फसवणुकीचं मोठं प्रकरण समोर आलंय. येथील एका व्यावसायिकाची मुंबईतील पॉश भागात इमारत प्रकल्प मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल १२७ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. काय आहे हे प्रकरण जाणून घेण्यासाठी वाचा पूर्ण बातमी...

fraud
fraud
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2023, 12:47 PM IST

सोनीपत/मुंबई Crime News : मुंबईतील १२ जणांनी मिळून हरियाणातील सोनीपत येथील एका ड्रग्ज विक्रेत्याची तब्बल १२७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय. ड्रग्ज विक्रेत्याला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी सोनीपत पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिसांनी मुंबईत राहणाऱ्या १२ जणांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. सोनीपत पोलिसांसह आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणी पुढील तपास करत आहे.

वरळी इमारत प्रकल्प देण्याच्या बहाण्यानं फसवणूक : मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत राहणाऱ्या काही लोकांनी सोनीपत येथील पावेल गर्ग या ड्रग्ज विक्रेत्याशी संपर्क साधला. त्यांनी गर्ग यांना मुंबईतील वरळी या पॉश भागात एक इमारत प्रकल्प देण्याच्या बहाण्यानं त्यांच्याकडून टप्याटप्यात १२७ कोटी रुपये घेतले. काही काळानंतर व्यावसायिकाला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची तक्रार सोनीपत पोलिसांकडे केली. पावेल गर्ग यांच्या तक्रारीवरून सोनीपत सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात कलम ४०३, ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

या प्रकरणी सोनीपत सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनचे प्रभारी रवींद्र कुमार यांनी पुढील माहिती दिली.

औषध व्यापारी पावेल गर्ग यांची १२७ कोटी रुपयांची फसवणूक झाली. पीडिताचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. मुंबईत इमारत मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याचं पीडितानं तक्रारीत म्हटलं आहे. तक्रारीच्या आधारे मुंबईत राहणाऱ्या १२ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. - रवींद्र कुमार, सिव्हिल लाइन पोलिस स्टेशन प्रभारी, सोनीपत

हे ही वाचा :

  1. Mumbai Crime News : मुंबईत माफिया अतिक अहमदच्या नावानं गोळीबार, जमीन हडपण्याचा प्रयत्न
  2. Cyber Crime in Maharashtra : वरिष्ठ पोलीस अधिकारीही हॅकर्सच्या टार्गेटवर, अधिकाऱ्यांचे फोटो लावून अनेकांना घालतायेत गंडा
  3. Morshi Murder Case : मोर्शी खून प्रकरणात धक्कादायक खुलासा, सलाईनमधून दिलं आई आणि लहान भावाला 'प्रतिबंधित औषध', कारण...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.