ETV Bharat / bharat

Bombs In Kanpur : होळीपूर्वी घरात सापडले तब्बल 288 बॉम्ब, कानपूर शहरात खळबळ! - देशी बॉम्ब जप्त

कानपूरमध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी 16 देशी बॉम्ब जप्त केले होते. काल पोलिसांनी एका घरातून तब्बल 288 बॉम्ब जप्त केले आहेत. होळीच्या पार्श्वभूमीवर बॉम्ब सापडल्याने कानपूर प्रशासनाने शहरातील प्रत्येक कोपऱ्यावर सुरक्षा वाढवली आहे.

Bombs In Kanpur
कानपूरमध्ये बॉम्ब
author img

By

Published : Mar 4, 2023, 8:39 AM IST

कानपूर (उ. प्रदेश) : एकीकडे राज्यातील लोक सध्या होळीच्या तयारीत व्यस्त असताना दुसरीकडे मात्र कानपूर शहरात बॉम्ब सापडल्याने पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. गुरुवारी पोलिसांनी वासू सोनकर या गुन्हेगाराला अटक केली आणि त्याच्याकडून 16 देशी बॉम्ब जप्त केले होते. तर शुक्रवारी पोलिसांनी वासूच्या मैत्रिणीच्या घरातून 288 देशी बॉम्ब जप्त करून तिला अटक केली आहे. होळीच्या काही दिवस अगोदरच एवढ्या मोठ्या प्रमाणात क्रुड बॉम्ब मिळाल्याने पोलीस विभाग सतर्क झाला असून सुरक्षा दलाला अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी शहरातील प्रत्येक चौकात पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे.

घरातून 288 देशी बॉम्ब जप्त : गेल्या गुरुवारी संध्याकाळी गुन्हेगार वासू सोनकर याला चमनगंज पोलिसांनी १६ देशी बॉम्बसह अटक केली होती. पोलिसांनी वासूची चौकशी केली असता त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करत शुक्रवारी त्याची मैत्रीण टीना गुप्ता वय (20) रा. लक्ष्मीपुरवा पोलीस स्टेशन रायपुरवा हिच्या घरी छापा टाकला. येथे पोलिसांनी तपासादरम्यान 288 देशी बॉम्ब जप्त केले आहेत. यानंतर पोलिसांनी कारवाई करत टीनाला अटक करून तिची रवानगी कारागृहात केली.

कानपूर पोलिसांची कारवाई सुरु : या प्रकरणी चमनगंज पोलिस ठाण्याचे प्रभारी अमरनाथ विश्वकर्मा यांनी सांगितले की, गुन्हेगार वासू सोनकर याच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी गुन्हे शाखेच्या पथकासह लक्ष्मीपुरवा, पोलिस स्टेशन रायपुरवा येथील रहिवासी टीना गुप्ता हिच्या घरावर छापा टाकला. तपासादरम्यान पोलिसांनी टीनाच्या घरातून 288 देशी बॉम्ब जप्त केले आहेत. या नंतर पोलिसांनी टीनाला अटक करून तिला तुरुंगात पाठवले. पोलिसांकडून या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

उमेश पाल हत्याकांडात भाजपची कारवाई : प्रयागराजच्या उमेश पाल हत्याकांडात नाव समोर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर कारवाई केली आहे. भाजपने त्यांच्या अल्पसंख्याक सेलचे महानगर अध्यक्ष राहिल हसन यांना पदावरून काढले आहे. त्यासोबतच प्रयागराजमधील अल्पसंख्याक सेलची समितीही बरखास्त केली गेली आहे. पोलिसांनी या प्रकरणी राहिल हसन यांचा भाऊ मोहम्मद गुलाम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी सध्या फरार आहे.

हेही वाचा : Old Man Murdered: शेतातच प्रेमी जोडपे करत होते 'तसले' चाळे.. म्हाताऱ्याने गुपचूप काढले फोटो.. वादानंतर म्हाताऱ्याची हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.