लखनौै - उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे सेलिब्रिटींनाही नातेवाईकांच्या मदतीसाठी झगडावे लागत आहे. अशात क्रिकेटपटू सुरेश रैनाने त्याच्या काकुंसाठी ऑक्सिजन सिलिंडर मिळावे, यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदत मागितली आहे.
सुरेश रैनाच्या काकींची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाल्याने त्यांना मेरठमधील रुग्णालयात दाखल केले आहे. प्रकृती अधिक बिघडल्याने ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. त्यामुळे क्रिकेटपटू सुरेश रैनाने ट्विट करत ऑक्सिजन सिलिंडरची मदत मागितली आहे. हे ट्विट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टॅग केले आहे.
हेही वाचा-दिल्लीला ५ मे रोजी ७३० मेट्रिक टन ऑक्सिजचा पुरवठा- केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती
मुख्यमंत्री योगी यांनी उत्तर देण्यापूर्वी अभिनेता सोनू सूदने मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. भाई, सविस्तर माहिती पाठवा, सिलिंडर दिले जाईल असे सोनूने ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यावर सुरेश रैनाने सोनू सूदचे आभार मानले आहेत. काही वेळानंतर ऑक्सिजन सिलिंडर मिळाल्याने रैनाने सर्वांचे आभार मानले आहेत.
हेही वाचा-पश्चिम बंगाल हिंसाचार : केंद्राची चार सदस्यीय समिती आढावा घेण्यासाठी रवाना
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर देण्यापूर्वी सोनू सूदने तत्परता दाखविल्याने नेटिझन्स त्याचे कौतुक करत आहेत.