नवी दिल्ली - भारतीय क्रिकेटला तब्बल १२ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू देणारे दिल्लीचे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक व द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त तारक सिन्हा यांचे शनिवारी (६ नोव्हेंबर) पहाटे तीन वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. सिन्हा हे ७१ वर्षांचे होते. तारक सिन्हा हे भारतीय क्रिकेटला सर्वाधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू देणारे प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या तब्बल १२ खेळाडूंनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले.
शनिवारी पहाटे तीन वाजता निधन -
देशात उत्तम क्रिकेटर घडावा आणि त्यांची निवड करता यावी यासाठी सिन्हा यांनी सोनेट क्लबची स्थापना केली होती. कल्बचे माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, 'भरल्या मनाने सांगावे लागत आहे की, दो महिन्यापासून कॅंन्सरशी झुंज देत असलेल्या सोनेट क्लबचे संस्थापक तारक सिन्हा यांचे शनिवारी पहाटे तीन वाजता निधन झाले आहे.'
त्यांनी उत्तम खेळाडूला घडवले -
आपल्या विद्यार्थ्यांमध्ये 'उस्ताद जी' नावाने ते मशहूर होते. पाच दशकाच्या काळात त्यांनी विद्यार्थ्यांमधील प्रतिभावान खेळाडू ओळखून त्याला घडवले. त्याचमुळे त्यांच्या शेवटच्या काळापर्यंत अनेक शिष्य हे त्यांच्यासोबत होते. ऋषभ पंत यासारख्या उत्तम खेळाडूला त्यांनी घडवले होते.
शिखर धवनसह यांना केला मार्गदर्शन -
त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये दिल्ली क्रिकेटचे दिग्गज सुरिंदर खन्ना, मनोज प्रभाकर, दिवंगत रमन लांबा, अजय शर्मा, अतुल वासन, संजीव शर्मा ही नावे शामिल आहेत. नव्वदीच्या दशकात त्यांनी आकाश चोपडा, अंजुम चोपड़ा, रूमेली धर, आशीष नेहरा, शिखर धवन और ऋषभ पंत असे प्रतिभावान खेळाडू दिले होते.
हेही वाचा - T20 World Cup 2021 : भारताचा 8 गडी व 81 चेंडू राखून स्कॉटलंडवर दणदणीत विजय