ETV Bharat / bharat

लसीकरण नोंदणी सुरू होताच कोविनसह आरोग्य सेतू अॅपचे सर्व्हर डाऊन! - CoWIN issue

केंद्र सरकारने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी 1 मेपासून लसीकरण करण्याची घोषणा 19 एप्रिलला केली आहे. सकाळी आरोग्य सेतू या केंद्र सरकारच्या कोरोनाचे व्यवस्थापन करणाऱ्या अॅपने आज सायंकाळी 4 वाजल्यानंतर लसीकरणाकरिता नोंदणी सुरू होणार असल्याचे ट्विट केले होते.

लसीकरण
लसीकरण
author img

By

Published : Apr 28, 2021, 5:56 PM IST

नवी दिल्ली - 18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी नोंदणी अनेक वापरकर्ते कोविन आणि आरोग्य सेतू अॅपमधून प्रयत्न करत आहे. मात्र, या वापरकर्त्यांना नोंदणी सायंकाळी 4 वाजताच सुरू होताच सर्व्हर क्रॅशच्या समस्येला सामोरे जावे लागले आहे.

अनेक वापरकर्त्यांना कोविन सर्व्हरची समस्या येत असताना पुन्हा प्रयत्न करा, असा संदेश येत होता. तर काही वापरकर्त्यांना टाईमआऊट इरर, 504 गेटवे टाईम-आऊटचा संदेश दिसत होता. तर अनेकांना नोंदणीकरता ओटीपी येत नव्हता. अशावेळी अनेक वापरकर्त्यांनी ट्विटरसह विविध समाज माध्यमांमध्ये सरकारवर रोष व्यक्त केला. लसीकरणाच्या नोंदणीसाठी ट्रॅफिक होणार असताना सरकारने आधी तयारी करायला हवी होती, अशी अनेकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.

हेही वाचा-ऑक्सिजन तुटवड्याला केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास कारणीभूत - पृथ्वीराज चव्हाण

केंद्र सरकारने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी 1 मेपासून लसीकरण करण्याची घोषणा 19 एप्रिलला केली आहे. सकाळी आरोग्य सेतू या केंद्र सरकारच्या कोरोनाचे व्यवस्थापन करणाऱ्या अॅपने आज सायंकाळी 4 वाजल्यानंतर लसीकरणाकरिता नोंदणी सुरू होणार असल्याचे ट्विट केले होते. वापरकर्त्यांना कोविन किंवा आरोग्य सेतू अॅपवरून लसीकरणाकरिता नोंदणी करता येणार असल्याचे आरोग्य सेतूने ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा-उच्च शिक्षित शाह कुटुंबीयांनी स्वीकारलं जैन मुनीत्व, सोडली बड्या पगाराची नोकरी

लसीकरणाची अधिक गरज

दरम्यान, मंगळवारी देशात 3.6 लाख कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले होते. तर 24 तासात 3 हजार कोरोनाच्या संसर्गाने रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने देशातील मृतांचा आकडा हा 2 लाखांहून अधिक झाला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरणाची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांना नोंदणी केल्याशिवाय लसीकरण केंद्रावर करणे शक्य होणार नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.