ETV Bharat / bharat

केरळमध्ये कोविड रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय; शेवटच्या तासाला मतदान करू शकणार - केरळात कोरोनाबाधित रुग्ण मतदान करणार

केरळ सरकारच्या मंत्रिमंडळाने बुधवारी कोविड रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी क्वारंटाईन व्यक्ती आणि कोरोना रुग्णांना मतदानाची संधी दिली जाणार आहे.

केरळ
केरळ
author img

By

Published : Nov 12, 2020, 11:01 AM IST

तिरुवनंतपुरम - देशात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. केरळ सरकारच्या मंत्रिमंडळाने बुधवारी कोविड रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आगामी स्थानिक संस्था निवडणुकांमध्ये शेवटच्या एका तासात कोविड रुग्णांना मतदानाची संधी दिली जाईल, असा निर्णय केरळ सरकारने घेतला आहे.

राज्यातील विजयन सरकारने बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. केरळ पंचायत राज अधिनियम आणि केरळ नगरपालिका अधिनियमात बदल करण्याची शिफारस राज्यपालांना करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. विजयन मंत्रिमंडळाने कोविड रुग्णांसाठी केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा शेवटचा एक तास देण्याचे ठरविले आहे. आतापर्यंत मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत निश्चित करण्यात आली आहे. यापैकी सायंकाळी 5 ते सायंकाळी 6 वाजेचा शेवटचा एक तास केवळ कोविड रुग्णांसाठी असणार आहे.

दोन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना मतदानाची संधी मिळणार नाही. क्वारंटाईन असलेल्या रुग्णांना मतदान करता येईल. कोविड रुग्णांना मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी, यासाठी केरळच्या मंत्रिमंडळाने आरोग्य विभागाला विशेष प्रोटोकॉल तयार करण्याचे आणि मतदान केंद्रांवर योग्य ती व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.

केरळात 78 हजार 812 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू -

केरळमध्येच देशातील पहिला कोरोनाची लागण झालेला रुग्ण आढळला होता. जानेवारी महिन्यात केरळमधील त्रिसूर येथे हा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर केरळमध्ये रुग्णांची संख्या जलद गतीने वाढत गेली. सध्या केरळमध्ये 78 हजार 812 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 4 लाख 15 हजार 158 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच 1 हजार 742 जणांचा बळी गेला आहे.

हेही वाचा - महाराष्ट्राकडून भाजपाने घेतला धडा! 'हे' होणार बिहारचे मुख्यमंत्री, सुशील मोदींची स्पष्टोक्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.