ETV Bharat / bharat

जाणून घ्या देशभरातील कोरोनाच्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी - corona death in india

आतापर्यंत भारतामध्ये 97,67,371 कोविड 19 प्रकरणे नोंदली गेली. यामध्ये 1,41,772 मृत्यूंचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार एकूण 92,53,306 रुग्ण बरे झाले आहेत.

कोविड -19
कोविड -19
author img

By

Published : Dec 11, 2020, 1:15 AM IST

हैदराबाद - भारतातील एकूण कोविड -19 चाचण्यांनी 15 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये केवळ दहा दिवसांत एका कोटी चाचण्यांची भर पडली आहे, असे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने गुरुवारी सांगितले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 9,22,959 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. ज्यामुळे भारताची एकूण चाचण्यांची संख्या 15,07,59,726 वर गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, "मागील एक कोटी चाचण्या केवळ १० दिवसात जोडल्या गेल्या. सतत आणि व्यापक तपासणीमुळे पॉझीटीव्ह प्रमाण कमी झाले."

कोविड -19
कोविड -19

दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांनी 6 लाखाचा टप्पा ओलांडला-

नवी दिल्ली - कोविड -19 च्या महामारीची राष्ट्रीय राजधानीतील तिसरी लाट अद्याप संपलेली नाही परंतु ती निश्चितच खालावली आहे, असे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी गुरुवारी सांगितले.

दिल्लीत कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा परिणाम आता हळूहळू कमी होत आहे. दिल्लीत प्रथमच कोरोना संसर्ग दर आता 2.46 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. दिल्लीत कोरोना संसर्ग होण्याचे हे आतापर्यंतचे सर्वात कमी दर आहे. त्याचवेळी, रिकवरी दर प्रथमच 95.23 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. हे लक्षात घेण्यासारखे देखील आहे की सक्रिय कोरोना रूग्णांचे प्रमाण सर्वात कमी पातळी 3.11 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

गुरुवारी सायंकाळी दिल्ली सरकारने जारी केलेल्या कोरोना हेल्थ बुलेटिननुसार गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1575 नवीन रुग्ण आढळले आहेत. आजच्या वाढीनंतर दिल्लीत कोरोनाची लागण होणारी एकूण संख्या 6 लाखांवर गेली आहे. आता ही आकडेवारी 601150 आहे. आतापर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, संसर्ग दर अजूनही 8.58 टक्के आहे.

महाराष्ट्र-

मुंबई - राज्यात ३,८२४ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे नवीन कोरोनाबाधितांचा आकडा १८,६८,१७२ वर पोहचला आहे. राज्यात आज ७० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात आजतागायत एकूण ४७,९७२ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ७१,९१० सक्रिय रुग्ण आहेत.

तसेच मुंबईतील उपनगरी लोकल गाड्यांमधून सर्वसामान्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्याचा निर्णय नवीन वर्षाचा उत्सव संपल्यानंतर घेण्यात येईल, असे मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी गुरुवारी सांगितले.

कर्नाटक-

बेंगळुरू: संरक्षण मंत्रालयाने आगामी एरो इंडिया 2021 साठी कोविड -19 मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ते त्यातील द्विवार्षिक एअर शो आणि प्रदर्शनासाठी पाळले जावेत. उत्तर बंगळुरुच्या येलाहंका येथील हवाई दलाच्या स्टेशनवर 3-7 फेब्रुवारी 2021 रोजी पाच दिवस हा कार्यक्रम होणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसाठी चाचणी आणि अलग ठेवण्याचे मार्गदर्शक तत्त्वे कर्नाटक सरकारच्या केले आहेत.

मध्य प्रदेश-

भोपाळ - मध्य प्रदेशातील कोविड -19 मधील सर्वात जास्त नुकसानग्रस्त जिल्हा असलेल्या इंदूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून सामान्य लोकांमध्ये होणाऱ्या संसर्गात हळूहळू वाढ झाली आहे, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.

गुरुवारी, मध्य प्रदेशात 1,319 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत, संसर्ग झालेल्यांची संख्या वाढून 2,19,893 झाली आहे. गुरुवारी, कोरोना बाधित सात रुग्णांचा मृत्यूही झाला आहे, रुग्णांचा मृत्यूचा आकडा वाढून 3,373 झाला आहे. आज 1307 संक्रमित रुग्ण बरे झाले आहेत व घरी गेले आहेत. आतापर्यंत 2,03,294 रूग्ण निरोगी झाल्यानंतर घरी परत आले आहेत, तर 13,226 रुग्ण सध्या बाधीत आहेत.

हेही वाचा- रेल्वे रुळांवर कब्जा करू, शेतकरी आंदोलकांचा सरकारला इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.