ETV Bharat / bharat

देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर - आयसीएमआर

कन्व्हेलेसेंट प्लाझ्मा थेरपी (सीपीटी) या उपचारपद्धतीच अनियंत्रित वापर करू नये, असे मत इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) व्यक्त केले आहे.

covid-19-news-from-across-the-nation
देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर
author img

By

Published : Nov 19, 2020, 1:37 AM IST

हैदराबाद - कोविड रुग्णांच्या उपचाराकरीता कन्व्हेलेसेंट प्लाझ्मा थेरपी (सीपीटी) ही उपरचार पद्धती वापरली जाते. परंतु या उपचारपद्धतीच अनियंत्रित वापर करू नये, असे मत इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) व्यक्त केले आहे. आज आयसीएमआरद्वारे ओपन-लेबल फेज II मल्टिसेंन्ट्रर र‌ॅडमाइज कंट्रोल चाचणी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये देशात सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयांमध्ये सीपीटीच्या वापरावर आयसीएमआरने हे मत व्यक्त केले. कन्व्हेलेसेंट प्लाझ्मा थेरपी (सीपीटी) ही उपचार पद्धती केलेल्या रूग्णांमध्ये कोरोना संसर्ग तसेच मृत्यू दरात कोणतीही कमी आली नसल्याचा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे.

covid-19-news-from-across-the-nation
कोरोना रुग्णसंख्या भारत

नवी दिल्ली- कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी तसेच भविष्यातील कोरोनाचा संसर्ग वाढू नये, याकरिता केंद्राने कडक पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. 45 डॉक्टर आणि 160 पॅरामेडिक्सची टीम दिल्लीत पोहोचली असून उर्वरित 30 डॉक्टर आणि 90 पॅरामेडिक्सची टीम या आठवड्याच्या शेवटी पोहोचतील, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे. तसेच केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील डॉक्टर आणि पॅरामेडिक्स दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील डीआरडीओ रुग्णालयात आणि छतरपूरमधील मेगा कोविड सेंटरमध्ये काम करण्यास सुरूवात करतील, असेही गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, साथीच्या आजारामुळे तलाव आणि नदीकाठच्या सार्वजनिक ठिकाणी छठ पूजा उत्सवावर बंदी घालण्याच्या दिल्ली सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला.

मुंबई- कोविड - 19 साथीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापालिकेने समुद्रकिनारी, नदीकाठी आणि इतर नैसर्गिक जलाशयांमध्ये छठ पूजा उत्सव साजरा करण्यास बंदी घातली आहे. तसेच भाविकांनी याठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले. तसेच सण साजरे करताना मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे, शारीरिक अंतर राखण्याचेही आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

हैदराबाद- तेलंगणा सरकारने सामाजिक, क्रीडा, करमणूक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांना हिरवा कंदील दिला आहे. राज्य सरकारने आता 200 लोकांच्या कमाल मर्यादेसह 50 टक्के हॉल क्षमतेचीदेखील परवानगी दिली आहे. ही परवानगी दिली असली, तरी कोरोना संबंधीत सर्व नियम पाळणे बंधनकारक असल्याचेही राज्य सरकारने म्हटले आहे.

बेंगळुरू- भारतातील मोठ्या शहरांच्या तुलनेत बंगळुरूमधील कोरोना रूग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे कर्नाटकचे आरोग्यमंत्री सुधाकर के. यांनी म्हटले आहे. शहरातील मृत्यूचे प्रमाण १.१ टक्के असून मंगळवारपर्यंत 3,36,880 रूग्ण कोरोनापासून बरे झाले आहे. तसेच 17,707 सक्रिय रूग्ण असल्याची माहिती, त्यांनी टि्वटद्वारे दिली आहे.

श्रीनगर- कश्मिरमधल्या प्रत्येकी पाचपैकी दोन व्यक्तींमध्ये कोरोनव्हायरसविरूद्ध लढण्यासाठी अ‌ॅन्टीबॉडीज तयार झाले असल्याचे एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे. ऑक्टोबरमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार पुलवामामध्ये सर्वाधिक प्रमाण 43.1 टक्के आणि कुलगाममध्ये सर्वात कमी 28.5 टक्के असल्याचे दिसून आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.