नवी दिल्ली : बुधवारी देशातील मृतांची संख्या चार हजारांच्या खाली गेल्यामुळे थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, गेल्या २४ तासांमध्ये पुन्हा एकदा ४,२०९ कोरोना बळींची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.
याचसोबत, देशात गेल्या २४ तासांमध्ये २ लाख, ५९ हजार ५५१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या संपूर्ण महिन्यातील ही एका दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. १७ मे रोजी पहिल्यांदा एका दिवसातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या तीन लाखांपेक्षा खाली आली होती. त्यापूर्वी ७ मे रोजी देशात एकाच दिवसातील सर्वाधिक रुग्णांची (4,14,188) नोंद झाली होती.
देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या सध्या २ कोटी, ६० लाख, ३१ हजार ९९१ झाली आहे. तर, एकूण बळींची संख्या २ लाख ९१ हजार ३३१वर गेली आहे. देशात सध्या ३० लाख, २७ हजार ९२५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांमध्ये ३ लाख ५७ हजार २९५ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. यानंतर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांची संख्या २ कोटी, २७ लाख, १२ हजार ७३५वर गेली आहे.
राज्यनिहाय कोरोना आकडेवारीसाठी येथे क्लिक करा..
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">