नवी दिल्ली - कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत 27 हजार 71 नव्या रुग्णांची आणि 336 मृत्यूची नोंद झाली आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे रुग्णांचा रिकव्हरी रेट 94.98 वर पोहचला आहे. तर मृत्यूचा दर 1.45 आहे.
देशात एकूण कोरोना रुग्णांची सख्या 98 लाख 84 हजार 100 झाली आहे. तर 1 लाख 43 हजार 355 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर 93 लाख 88 हजार 159 जण कोरोनामुक्त झाले आहते. तर 3 लाख 52 हजार 586 जणांवर देशातील विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. कोरोना रुग्णांनी 7 ऑगस्टला 20 लाख, 23 ऑगस्टला 30 लाख, 5 सप्टेंबरला 40 लाख, 16 सप्टेंबरला 50 लाख, 28 सप्टेंबरला 60 लाख, 11 ऑक्टोंबरला 70 लाख, 29 ऑक्टोबरला 80 लाख आणि 20 नोव्हेंबरला 90 लाखाचा टप्पा पार केला.
महाराष्ट्रात सर्वांत जास्त मृत्यू -
आज सकाळी आठ वाजेपर्यंत मृत्यू झालेल्या 336 रुग्णांमध्ये महाराष्ट्रात 70, दिल्लीत 33, पश्चिम बंगालमध्ये 47, केरळमध्ये 29 आणि पंजाबमध्ये 20 रुग्णांचा बळी गेला आहे. आतापर्यंत सर्वांत जास्त 48 हजार 209 मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. त्यापाठोपाठ कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पंजाबमध्ये मृत्यू दर जास्त आहे. याचबरोबर मंगळवारी दिवसभरात 8 लाख 55 हजार 157 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. तर आतापर्यंत एकूण 15 कोटी 45 लाख 66 हजार 990 कोरोना चाचण्या पार पडल्या आहेत.
बिल गेट्स यांचा कोरोनाबाबत इशारा -
कोरोनावर मात करण्यासाठी जगभरातून लस विकसीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यातच मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी आगामी चार ते सहा महिने अत्यंत वाईट असून दोन लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असे म्हटलं आहे. जर आपण कोरोना नियमांचे पालन केले. तरच मृत्यूची संख्या थोडी कमी होईल, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - 'शुद्राला शूद्र म्हटलं तर त्यांना वाईट वाटतं'; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे वादग्रस्त वक्तव्य