ETV Bharat / bharat

स्वदेशी कोव्हॅक्सिन लस पारदर्शक, वैज्ञानिक मानकासाठी वचनबद्ध - सुचित्रा इला - स्वदेशी कोव्हॅक्सिन लस वैज्ञानिक मानकासाठी वचनबद्ध

भारत बायोटेकने म्हटले आहे की, भारताच्या नियामकांनी कोवॅक्सिन लसीच्या चाचणीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील संपूर्ण डेटाचा आणि तिसर्‍या टप्प्यातील आंशिक डेटाचा काळजीपूर्वक आढावा घेतला आहे.

bharat biotech
भारत बायोटेक
author img

By

Published : Jun 13, 2021, 11:52 AM IST

नवी दिल्ली - शैक्षणिक जर्नल्स, प्रमुख समीक्षकांनी, एनआयव्ही-आयसीएमआर-बीबी संशोधक आणि शास्त्रज्ञांनी नऊ अभ्यास आणि डेटा प्रकाशित केला आहे. म्हणून कोव्हॅक्सिनचे वैज्ञानिक मानक आणि वचनबद्धता पारदर्शी आहे. भारत बायोटेकच्या सह संस्थापक आणि संयुक्त प्रबंध निदेशक सुचित्रा इला यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

12 महिन्यात नऊ संशोधन प्रकाशित -

भारत बायोटेकने म्हटले आहे की, भारताच्या नियामकांनी कोवॅक्सिन लसीच्या चाचणीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील संपूर्ण डेटाचा आणि तिसर्‍या टप्प्यातील आंशिक डेटाचा काळजीपूर्वक आढावा घेतला आहे. कंपनीने कोव्हॅक्सिनच्या सुरक्षिततेच्या आणि प्रभावीपणाबद्दलच्या पाच जागतिक स्तरावर नामांकित सर्वोत्तम पुनरावलोकन जर्नल्समध्ये गेल्या 12 महिन्यांत नऊ संशोधन आधीच प्रकाशित केले आहेत. कंपनीने म्हटले आहे की, कोव्हॅक्सिन ही एकमेव पूर्णपणे कोरोनावरील लस आहे जिने भारतात मानवी चाचणी केल्याचा डाटा प्रकाशित केला आहे.

कंपनीने म्हटले आहे की भारत बायोटेक ने तीन प्रीक्लीनिकल अभ्यास केले आहेत जे 'सेलप्रेस' या अग्रगण्य समीक्षा जर्नलमध्ये प्रकाशित केले गेले. कोव्हॅक्सिन लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील परिक्षण आघाडीच्या समीक्षा जर्नल द लान्सेटमध्ये प्रकाशित करण्यात आले.

हेही वाचा - केरळातील 100 किलो सोने तस्करी प्रकरणी एनआयएची सांगली जिल्ह्यात छापेमारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.