बागपत (उत्तर प्रदेश): उत्तरप्रदेशातील बागपत येथील बरौत नगर भागातील छोटे व्यावसायिक असलेल्या एका दाम्पत्यांने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न ( Couple attempts suicide in FB LIVE ) केला आहे. यावेळी त्यांनी फेसबुक लाईव्ह करून आपण नोटाबंदी आणि जीएसटीमुळे आर्थिक विवंचनेत आहोत त्यामुळे आत्महत्या करत असल्याचे ( Facebook Live Suicide UP ) सांगितले, तसेच यासर्व घटनेला केंद्र सरकारला जबाबदार धरण्यात यावे असेही त्याने व्हिडिओत म्हटले आहे. या घटनेनंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र यावेळी त्यांच्या पत्नींचा मृत्यू झाला होता. तर त्यांच्या पतीवर उपचार सुरू आहे.
उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू -
बागपत येथील बुट आणि चप्पल विक्रेता छोटा व्यापारी हा जीएसटी आणि नोटबंदीमुळे आर्थिक विवंचनेत सापडल्याने फेसबुक लाईव्हवर व्यापारी दाम्पत्याने आत्महत्या केली. ही बाब नातेवाईकांना कळताच त्यांनी तत्काळ घरी धाव घेतली आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यावेळी उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला आहे तर व्यापारी पतीची अवस्था गंभीर आहे. घटनेनंतर नातेवाईकांनी गोंधळ घातला होता. पोलिसांनी मृत महिलेचे शव ताब्यात घेतले असून त्याला शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.