ETV Bharat / bharat

देशात सप्टेंबरमध्ये सरासरीहून अधिक पाऊस होईल- भारतीय हवामान विभागाचा अंदाज - SST influence on the Indian monsoon

ऑगस्टमध्ये सरासरीहून 24 टक्के कमी पाऊस झाला आहे. उत्तर भारत, ईशान्य भारत आणि दक्षिण भारतामधील काही भागांमध्ये सरासरी ते कमी पाऊस होईल, असा अंदाज असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

भारतीय हवामान विभागाचा अंदाज
भारतीय हवामान विभागाचा अंदाज
author img

By

Published : Sep 1, 2021, 4:39 PM IST

नवी दिल्ली - देशात ऑगस्टमध्ये सरासरी पावसाच्या तुलनेत 24 टक्के कमी पाऊस झाला आहे. मात्र, सप्टेंबरमध्ये सरासरीहून अधिक देशात पाऊस होईल, असा अदांज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

सप्टेंबरमध्ये भारताच्या अनेक भागांमध्ये सरासरीहून अधिक व सरासरी पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूजंय मोहापात्रा यांनी व्यक्त केला. देशातील अंदाजित पावसाचे प्रमाण हे ऑक्टोबरमध्ये सरासरीहून अधिक (सरासरी पर्जन्यापेक्षा 110 टक्क्यांहून अधिक) असणार आहे. सध्या मान्सूनचे प्रमाण 9 टक्क्यांनी कमी आहे. मात्र, सप्टेंबरमध्ये चांगले पर्जन्यमान झाल्याने सरासरी मान्सूनचे प्रमाण वाढणार आहे.

हेही वाचा-भारत अफगाणिस्तानच्या घडामोडीत गुंग; चीनकडून हिंद महासागारात पोहोचण्याचा नवा मार्ग खुला

ऑगस्टमध्ये सरासरीहून 24 टक्के कमी
ऑगस्टमध्ये सरासरीहून 24 टक्के कमी पाऊस झाला आहे. उत्तर भारत, ईशान्य भारत आणि दक्षिण भारतामधील काही भागांमध्ये सरासरी ते कमी पाऊस होईल, असा अंदाज असल्याचे मोहापात्रा यांनी सांगितले.

हेही वाचा-'पंच प्यारे' विधानावरून हरीश रावत वादाच्या भोवऱ्यात; वाचा काय प्रकरण...

एल निनोचा प्रभाव सुरुच राहणार
पावसाचा अंदाज वर्तविणाऱ्या नव्या जागतिक मॉडेलनुसार एल निनोचा प्रभाव प्रशांत महासागराच्या भागात सुरुच राहणार आहे. सागरी पृष्ठभागाचे तापमान (SST) हे वाढत असल्याने पुन्हा ला निनाची स्थिती मान्सून अखेर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. सागरी पृष्ठभागाच्या तापमान स्थितीचा प्रशांत महासागर आणि हिंद महासागरावर मोठा परिणाम होता. त्याचा प्रभाव भारतीय मान्सूनवर होतो. भारतीय हवामान विभागाकडून सागरी पात्रालगत असलेल्या सागरी पृष्ठभागाच्या स्थितीवर काळजीपूर्वक देखेख केली जात असल्याचे आयएमडीचे महासंचालक मृत्यूजंय मोहापात्रा यांनी सांगितले.

हेही वाचा-व्हॉट्सअपचा वापरकर्त्यांना दणका; 16 जून ते 31 जुलैपर्यंत 30 लाख अकाउंट बंद

ऑगस्टमध्ये असे राहिले देशातील पावसाचे प्रमाण

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार 1 जून ते 10 ऑगस्ट या कालावधीदरम्यान देशभरात सामान्यपेक्षा 5 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. पूर्व आणि ईशान्येकडील भागात यादरम्यान 12 टक्के तर वायव्य आणि मध्य भारतात अनुक्रमे दोन आणि सात टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. दक्षिण भारतात मात्र यादरम्यान सरासरीपेक्षा आठ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.