ETV Bharat / bharat

Dantewada Naxalite Attack : नक्षलवाद्यांविरोधात संयुक्त मोहीम सुरू करावी, देशभरातून नक्षल हल्ल्याविरोधात संताप

author img

By

Published : Apr 27, 2023, 7:17 AM IST

नक्षलवाद्यांनी दंतेवाडा येथे 11 जवानांचा बळी घेतल्याने देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. आता नक्षलवाद्यांविरोधात संयुक्त मोहीम राबवून नक्षलवाद्यांचा नायनाट करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Country Angry On Dantewada Naxalite Attack
संग्रहित छायाचित्र

दंतेवाडा : नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पुन्हा एकदा देशाचे 11 शूर जवान शहीद झाल्याने देशभरात संताप निर्माण झाला आहे. या हल्ल्यात एका नागरिकाचाही बळी गेला आहे. बुधवारी नक्षलवाद्यांनी सुरक्षा कर्मचार्‍यांच्या ताफ्यातील वाहनाला उडवले. यात डीआरजीचे 11 जवान शहीद झाले. देशाच्या दहा जवानांना नक्षलवाद्यांमुळे आपले बलिदान द्यावे लागले. त्यामुळे देशभरात संताप निर्माण झाला आहे. नक्षलवाद्यांविरोधात आंतरराज्य मोहीम सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.

नक्षलवाद्यांचा केला पूर्वनियोजित कट : नक्षलवाद्यांनी पूर्वनियोजितपणे अरनपूरमध्ये हल्ला केला. या हल्ल्यात नक्षलवाद्यांनी 40 किलो इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस वापरले. नक्षलवाद्यांनी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडवून आणली. शोध पथकाच्या मदतीसाठी गेलेली टीम परतत असतानाच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळावरील दृश्यांमध्ये स्फोटाच्या ठिकाणी रस्त्यावर एक मोठा खड्डा पडलेला दिसत आहे. हा खड्डा सुमारे 10 फूट खोल आहे. एमयूव्ही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. बस्तरच्या पोलीस महानिरीक्षकांनी हा नक्षलवाद्यांचा सुनियोजित कट असल्याचे म्हटले आहे. सुरक्षा दलाच्या पथकाला लक्ष्य करून हा नक्षलवादी हल्ला करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस महासंचालकांनी घेतला आढावा : नक्षलवाद्यांनी जवानांचा बळी घेतल्यानंतर सगळीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे छत्तीसगडचे पोलीस महासंचालक अशोक जुनेजा यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. महासंचालक अशोक जुनेजा यांनी रायपूरमध्ये नक्षलविरोधी अभियानाची बैठक घेऊन घटनेचा आढावा घेतला. या बैठकीत नक्षलविरोधी ऑपरेशन आणि राज्य गुप्तचर शाखेचे अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नक्षलवादी हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी शूर जवानांच्या हौतात्म्याला अभिवादन केले. दंतेवाडा येथील पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण करत, त्यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील असे स्पष्ट केले. माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. नक्षलवाद्यांवर कठोर कारवाई करण्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

गृहमंत्री अमित शाहांनी घेतली मुख्यमंत्र्यांकडून माहिती : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत चर्चा केली आहे. त्यांनी या हल्ल्याचा निषेध करत छत्तीसगडला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले असून गुरुवारी ते शूर जवानांना श्रद्धांजली वाहणार आहेत. जवानांबद्दल शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी नक्षलवादाविरुद्धचा लढा अंतिम टप्प्यात असून नक्षलवाद्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. आम्ही समन्वयाने काम करून नक्षलवादाचा नायनाट करू, असे स्पष्ट केले.

आंतरराज्यीय संयुक्त कारवाईची मागणी : या नक्षलवादी हल्ल्यावर विरोधकांनी सरकारकडे नक्षलवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी नक्षलवाद संपवण्यासाठी आंतरराज्यीय संयुक्त ऑपरेशनचा मार्ग अवलंबण्याची मागणी केली आहे. भाजप नेते ब्रिजमोहन अग्रवाल यांनीही नक्षलवाद्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा - Naxalite attack in Dantewada : दंतेवाडात नक्षलवाद्यांचा हल्ला, IED स्फोटात 11 जवान शहीद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.