नवी दिल्ली : भारताची राजधानी असलेल्या दिल्लीच्या एका रेस्टॉरंटमध्ये महिलेने साडी घातल्याने तिला प्रवेश नाकारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे भारतभर गोंधळ उडाला आहे. शिवाय, लोकही रेस्टॉरंटवर संतापले आहेत. दरम्यान, रेस्टॉरंटमध्ये साडी घालण्यास परवानगी नाही. यावरून महिला आणि हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. लोक रेस्टॉरंटवर टीका करत आहेत.
'फक्त स्मार्ट कॅज्युअल्सला परवानगी, साडी स्मार्ट कॅज्युअल्समध्ये नाही'
साडी नेसलेल्या एका महिलेस रेस्टॉरंटमध्ये जाण्यास नकार दिल्यानंतर दिल्लीतील 'अकिला' नावाचे रेस्टॉरंट सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका महिलेने रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांना विचारले की, तिला आत का जाऊ दिले जात नाही? त्यावर कर्मचारी म्हणाली की "मॅडम, आम्ही फक्त स्मार्ट कॅज्युअल्सला परवानगी देतो आणि साडी स्मार्ट कॅज्युअल्समध्ये येत नाही."
वाचा नक्की काय आहे प्रकरण?
दक्षिण दिल्लीच्या अकिला रेस्टॉरंटमध्ये अनीता चौधरी यांना साडी नेसून गेल्यामुळे प्रवेश दिला नाही. ही घटना 19 सप्टेंबरची असल्याचे सांगितलेत जात आहे. हा व्हिडिओ 19 सप्टेंबरचा असल्याचे सांगितले जात आहे. परंतु या महिलेने 20 सप्टेंबर रोजी हा व्हिडिओ व्हायरल केला. त्यानंतर लोक संतप्त प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.
-
Saree is not allowed in Aquila restaurant as Indian Saree is now not an smart outfit.What is the concrete definition of Smart outfit plz tell me @AmitShah @HardeepSPuri @CPDelhi @NCWIndia
— anita choudhary (@anitachoudhary) September 20, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Please define smart outfit so I will stop wearing saree @PMishra_Journo #lovesaree pic.twitter.com/c9nsXNJOAO
">Saree is not allowed in Aquila restaurant as Indian Saree is now not an smart outfit.What is the concrete definition of Smart outfit plz tell me @AmitShah @HardeepSPuri @CPDelhi @NCWIndia
— anita choudhary (@anitachoudhary) September 20, 2021
Please define smart outfit so I will stop wearing saree @PMishra_Journo #lovesaree pic.twitter.com/c9nsXNJOAOSaree is not allowed in Aquila restaurant as Indian Saree is now not an smart outfit.What is the concrete definition of Smart outfit plz tell me @AmitShah @HardeepSPuri @CPDelhi @NCWIndia
— anita choudhary (@anitachoudhary) September 20, 2021
Please define smart outfit so I will stop wearing saree @PMishra_Journo #lovesaree pic.twitter.com/c9nsXNJOAO
महिलेचा आरोप काय?
अनिता चौधरी यांनी त्यांना प्रवेश नाकारल्याचा व्हिडिओ व्हायरल केला. यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिल्याचाही एक व्हिडिओ व्हायरल केला. 'माझ्या मुलीचा वाढदिवस होता. मी आधीच टेबल बुक केला होता. त्यामुळे अकिला रेस्टॉरंटमध्ये गेली, तिथे गेल्यानंतर मला रोखण्यात आले. शिवाय मला सांगण्यात आले की तुम्ही साडी नेसून जाऊ शकत नाही. जेव्हा मी हॉटेल मॅनेजरला विचारले की हा तुमचा नियम आहे का? तेव्हा मला उत्तर देण्यात आले नाही. तसेच आम्ही पोलिसांना बोलवू आणि त्यांनी त्यांच्या बाउन्सर्सनाही बोलावले. पण आता ते खोटे बोलत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर माझ्या समोर येऊन बोलावे', असे अनिता यांनी म्हटले आहे.
'साडी नेसण्याचे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न'
'साडी ही भारताचा पारंपारिक पोशाख आहे. पण ज्या पद्धतीने मला साडी घातल्याने प्रवेशास बंदी घातली, त्यामुळे माझे हृदय दुखावले आहे. प्रत्येक स्त्रीला साडी नेसण्याचा अधिकार आहे. परंतु आजकाल लोक रेस्टॉरंटमध्ये बदलले आहेत आणि हे माहित नाही की या भारत देशात साडीला प्राधान्य का दिले जात नाही. प्रत्येक स्त्रीचे साडीमध्ये दिसण्याचे स्वप्न असते', असेही अनिता यांनी म्हटले आहे.
मॅनेजरने आरोप फेटाळले
तर अकिला रेस्टॉरंटचे व्यवस्थापक सिद्धार्थ यांनी स्पष्टीकरण देत महिलेचे आरोप फेटाळले आहेत. 'संबंधित महिलेने प्रथम जबरदस्तीने प्रवेश केला. आमच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. एवढेच नाही तर त्यांनी आमच्या एका कर्मचाऱ्याला थप्पडही मारली. आम्ही तिला वारंवार विनंती करत राहिलो. शिवाया आम्हीच माफी मागितली. पण त्या आमच्या कर्मचाऱ्यांवर संतापली आणि गैरवर्तन करत राहिली. त्यांनी व्हायरल केलेला व्हिडिओ पूर्ण नाही. अर्धाच आहे. उर्वरित सत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. ज्यामध्ये त्याने आमच्या कर्मचाऱ्याला थप्पड मारल्याचे दिसत आहे', असे मॅनेजरने म्हटले आहे.
'साडी नेसणाऱ्या महिलांना बंदी नाही'
'दररोज महिला साडी नेसून आमच्या रेस्टॉरंटमध्ये येतात. साडी हा आपल्या भारताचा अतिशय पारंपारिक पोशाख आहे. आम्ही हे करू शकत नाही. पण ती करत असलेले आरोप सर्व चुकीचे आहेत', असे मॅनेजरने म्हटले आहे.
यावर अभिनेत्री ऋचा चड्ढा भडकली
-
This snobbery- denouncing our traditional clothes, looking down upon our own languages is the residue of post-colonisation trauma. It also creates a fertile breeding ground for fascism that exploits this very trauma. The Sari is smart, your policy isn’t! #SariNotSorry #Aquila https://t.co/4nNli9nYXU pic.twitter.com/klRNK9rgAW
— TheRichaChadha (@RichaChadha) September 22, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">This snobbery- denouncing our traditional clothes, looking down upon our own languages is the residue of post-colonisation trauma. It also creates a fertile breeding ground for fascism that exploits this very trauma. The Sari is smart, your policy isn’t! #SariNotSorry #Aquila https://t.co/4nNli9nYXU pic.twitter.com/klRNK9rgAW
— TheRichaChadha (@RichaChadha) September 22, 2021This snobbery- denouncing our traditional clothes, looking down upon our own languages is the residue of post-colonisation trauma. It also creates a fertile breeding ground for fascism that exploits this very trauma. The Sari is smart, your policy isn’t! #SariNotSorry #Aquila https://t.co/4nNli9nYXU pic.twitter.com/klRNK9rgAW
— TheRichaChadha (@RichaChadha) September 22, 2021
अभिनेत्री ऋचा चढ्ढा हिने देखील रेस्टॉरंट आणि या व्हिडिओवर आपला राग व्यक्त केला. "आपल्या पारंपारिक कपड्यांचा निषेध करणे, आपल्या स्वतःच्या भाषांचा अवमान करणे हे वसाहत वादानंतरच्या आघाताचा अवशेष आहे. हे फॅसिझमला प्रोत्साहन देणारे कृत्य आहे. जे या आघातचा फायदा घेत आहेत. साडी स्मार्ट आहे, तुमची पॉलिसी नाही #SariNotSorry #Aquila" असे ऋचाने ट्विटमध्ये लिहिले आहे.