नवी दिल्ली - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून गेलेल्या भारतीयांकरिता चिंताजनक बातमी आहे. आयआयटी कानपूरच्या अभ्यासानुसार चालू वर्षात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. दिलासादायक बाब म्हणजे दुसऱ्या लाटेच्या तुलनेत ही लाट कमी तीव्र असणा आहे. यापूर्वीच कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याबाबत राज्य व केंद्र सरकारचे एकमत झाले आहे.
आयआयटी कानपूरचे प्राध्यापक राजेश रंजन आणि महेंद्र वर्मा आणि त्यांच्या टीमने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत अभ्यास करून काही निष्कर्ष काढले आहेत. आयआयटी कानपूरच्या माहितीनुसार धोरणकर्ते आणि लोकांमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत तीव्र चिंता आहे. आयआयटीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील निकष पाहून एसआआयआर मॉडेलचा वापर केला आहे. या मॉडेलनुसार तिसरी तीव्र लाट ही सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये येणार आहे. मात्र, ही तीव्रता दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी असेल. सोशल डिस्टनिंसगचे पालन करून तिसऱ्या लाट ऑक्टोबरपर्यंत लांबविता येणे शक्य आहे.
हेही वाचा-काय सांगता! सोने, चांदी नाही, तर 8 क्विंटल शेणाची चोरी
देशात कोरोना पॉझिटिव्हिचा घसरला दर-
भारतामध्ये कोरोना पॉझिटिव्हटीचा दर कमालीचा कमी झाला आहे. १९ जूनला केवळ कोरोनाचे नवीन ६३ हजार रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनाची तीव्रता असताना रोज सरासरी ४ लाख कोरोनाचे रुग्ण आढळत होते.
हेही वाचा-खाद्यप्रेमींची माणुसकी... सायकलरून झोमॅटोची डिलिव्हरी देणाऱ्या अकीलला दिली दुचाकी गिफ्ट
आठवडाअखेर नवीन माहिती केली जाणार जाहीर-
एसआयआर मॉडेलमध्ये लसीकरणाचा विचार करण्यात आला नाही. लसीकरण केल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे प्रमाण कमी होऊ शकते. आयआयटी कानपूरकडून या आठवडाअखेर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत नवीन माहिती जाहीर केली जाणार आहे.
एम्सनेही दिला आहे तिसऱ्या लाटेचा इशारा-
महाराष्ट्र टास्क फोर्सने कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा दिल्यानंतर एम्सनेही तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. जर कोरोनाच्या काळात योग्य नियमांचे पालन करणे व गर्दी टाळणे नाही केल्यास कोरोनाची तिसरी लाट अटळ आहे. येत्या सहा ते आठ आठवड्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असा इशारा एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी शनिवारी दिला आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचे प्रमाण वाढत आहे, त्या ठिकाणी क्षेत्रनिहाय कठोर लॉकडाऊन करावे, असे मत डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक धोका असल्याचे दाखविणारी आकडेवारी अद्याप समोर आली नाही, असेही गुलेरिया यांनी सांगितले. आर्थिक चलनवलन लक्षात घेता राष्ट्रीय पातळीवर लॉकडाऊन हा पर्याय नाही. मोठ्या प्रमाणात लसीकरण, कोरोनाच्या काळात नियमांचे योग्य पालन हे अधिक करण्याची गरज असल्याचे गुलेरिया यांनी शनिवारी सांगितले.