ETV Bharat / bharat

Country Corona Update : भारतात कोरोनाचे 1,79,723 तर ओमायक्रॉनचे 4,033 रुग्ण - Omicron Latest Marathi news

भारतात ओमायक्रॉनची प्रकरणे वाढू लागली आहेत. देशातील 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना विषाणू (Omicron in India) ची लागण झालेल्या (Corona new variant omicron) लोकांची संख्या आतापर्यंत 4,033 झाली आहे.

Country Corona Update
Country Corona Update
author img

By

Published : Jan 10, 2022, 12:15 PM IST

Updated : Jan 10, 2022, 12:27 PM IST

नवी दिल्ली - भारतात ओमायक्रॉनची प्रकरणे वाढू लागली आहेत. देशातील 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना विषाणू (Omicron in India) ची लागण झालेल्या (Corona new variant omicron) लोकांची संख्या आतापर्यंत 4,033 झाली आहे. महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये ओमायक्रॉनची सर्वाधिक 1,216 आणि 529 प्रकरणे आहेत. ओमायक्रॉनच्या 4,033 रुग्णांपैकी 1,552 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.

मंत्रालयाने सकाळी 8 वाजता प्रदर्शित केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 1,79,723 नवीन प्रकरणे (new cases of Corona) नोंदली गेली आहेत. गेल्या 225 दिवसांत सर्वाधिक कोरोना केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. देशात 3,57,07,727 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्याचबरोबर कोरोना संसर्गामुळे 146 लोकांचा मृत्यू झाला. तर एकूण मृत्यूंची संख्या 4,83,936 वर पोहोचली आहे.

देशात अजूनही 7,23,619 अॅक्टीव्ह केसेस

कोरोना संसर्गामुळे गेल्या 24 तासात 46,569 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. देशात अजूनही 7,23,619 सक्रिय प्रकरणे आहेत. आतापर्यंत ३,४५,००,१७२ रुग्णांनी या संसर्गावर मात केली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (Indian Council of Medical Research) म्हणण्यानुसार, भारतात आतापर्यंत कोरोना विषाणूसाठी 13,52,717 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. कालपर्यंत एकूण 69,15,75,352 नमुना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १,५१,९४,०५,९५१ लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

हेही वाचा - Booster Dose From Today : आजपासून बूस्टर डोस देण्यास सुरुवात; वाचा काय आहे नियमावली

Last Updated : Jan 10, 2022, 12:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.