ETV Bharat / bharat

देशभरात एकाच दिवसात कोरोनाचे ५२९ रुग्ण, तिघांचा मृत्यू - कोरोना

Corona Virus Update : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात एका दिवसात ५२९ नवीन रुग्ण आढळले. यापैकी ९० टक्के रुग्ण फक्त पाच राज्यांतील आहेत.

Corona Virus
Corona Virus
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 27, 2023, 5:40 PM IST

नवी दिल्ली Corona Virus Update : देशभरात एकाच दिवसात कोरोनाची ५२९ नवीन प्रकरणं नोंदली गेली आहेत. यासह आता सक्रिय संक्रमणांची संख्या ४,०९३ एवढी झाली. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, २४ तासांच्या कालावधीत कोरोनामुळे तीन जणांचे मृत्यू झाले. यापैकी दोन कर्नाटकातील आणि एक गुजरातमधील आहे. ५ डिसेंबरपर्यंत दैनंदिन प्रकरणांची संख्या दुहेरी आकड्यांपर्यंत घसरली होती. परंतु नवीन j1 व्हॅरियंट उदयास आल्यानंतर आणि थंडीत वाढ झाल्यानंतर संक्रमण पुन्हा वाढलं आहे.

पाच राज्यांमध्ये ९० टक्के केसेस : संपूर्ण भारतात कोविड - १९ प्रकरणांमध्ये किंचित वाढ झाली आहे. ओडिशात गेल्या २४ तासांत दोन नवीन कोविड प्रकरणं नोंदवली गेली. यासह राज्यात डिसेंबरमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरस प्रकरणांची संख्या पाच झाली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यानं बुधवारी ही माहिती दिली. ओडिशात नोव्हेंबरमध्ये ११ प्रकरणं नोंदवली गेली होती. केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि गोवा या पाच राज्यांमध्ये कोरोनाचा वेगानं प्रसार होत असून, देशातील एकूण केसेस पैकी ९० टक्क्यांहून अधिक केसेस या राज्यांतील आहेत.

४.५ कोटींहून अधिक लोकांना संसर्ग : २०२० च्या सुरुवातीस सुरू झालेल्या या साथीच्या रोगाचा आतापर्यंत देशभरातील ४.५ कोटींहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. गेल्या चार वर्षांत जवळपास ५.३ लाखांहून अधिक मृत्यू झाले. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या ४.४ कोटींहून अधिक आहे. तर बरं होण्याचा दर ९८.८१ टक्के आहे. देशभरात कोरोनामुळे मृत्यू दर १.१९ टक्के आहे. वेबसाइटनुसार, आतापर्यंत देशात कोविड लसींचे २२०.६७ कोटी डोस देण्यात आले आहेत.

हे वाचलंत का :

  1. देशात कोरोना रुग्ण संख्येत वाढ; व्हायरसचा धोका नाही पण काळजी घेण्याचं WHO चं आवाहन
  2. सावधान! देशभरात कोरोना पसरतोय; कर्नाटकात एकाचा मृत्यू, चंदीगडमध्ये मास्क परतले
  3. कर्नाटकमध्ये ३ कोरोना रुग्णांचा मृत्यू, देशभरात कोरोना रुग्णसंख्या किती आहे?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.