रायपूर- छत्तीसगड मध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. रविवारी राज्यात 12,666 नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. तर 24 तासात तब्बल 190 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 11,223 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले. छत्तीसगड राज्यात सध्या एकूण 1,23,835 रुग्ण कोरोनाबाधित आहेत.
राजधानी रायपूरमध्ये कोरोना अनियंत्रित
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. तरीही कोरोना वाढीचा आणि मृतांचा आकडा नियंत्रणात येण्याचे नाव घेत नाही. रविवारी राजधानी रायपूरमध्येर 1,639 नवीन रुग्ण आढळून आले. तर 44 कोरोनाबधितांचा मृत्यू झाला.
मृत्यू संख्या
तारीख | मृत्यू |
16 एप्रिल | 138 |
17 एप्रिल | 138 |
18 एप्रिल | 170 |
19 एप्रिल | 165 |
20 एप्रिल | 181 |
21 एप्रिल | 183 |
22 एप्रिल | 197 |
23 एप्रिल | 219 |
24 एप्रिल | 203 |
25 एप्रिल | 190 |
कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी
तारीख | नवे रुग्ण |
7 एप्रिल | 10310 |
8 एप्रिल | 10652 |
9 एप्रिल | 11447 |
10 एप्रिल | 14098 |
11 एप्रिल | 10,521 |
12 एप्रिल | 13,576 |
13 एप्रिल | 15,121 |
14 एप्रिल | 14,250 |
15 एप्रिल | 15,256 |
16 एप्रिल | 14,912 |
17 एप्रिल | 16,083 |
18 एप्रिल | 12,345 |
19 एप्रिल | 13,834 |
20 एप्रिल | 15,625 |
21 एप्रिल | 14,519 |
22 एप्रिल | 16,750 |
23 एप्रिल | 17,397 |
24 एप्रिल | 16,731 |
25 एप्रिल | 12,666 |
राज्यातील तीन महत्वाच्या जिल्ह्यातील बाधित रुग्णसंख्या
रायपूर | 1,639 |
दुर्ग | 1,355 |
बिलासपूर | 988 |
दुर्ग जिल्ह्यात परिस्थिती गंभीर
दुर्गमध्ये कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. रविवारी जिल्ह्यात एकूण 1,355 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.तर 21 जणांचा मृत्यू झाला. बिलासपूर जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या ठिकाणी रविवारी 988 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृतांच्या आकड्याने वाढवली चिंता
राज्यात कोरोना मुळे होणाऱ्या मृतांचा आकडा कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सातत्याने यामध्ये भर पडत आहे. गेल्या तीन दिवसांपासून 200 पेक्षा जास्त मृत्यूचे आकडे समोर येत आहेत. रविवारी मृतांची आकडेवारी कमी होती.मात्र गेल्या 24 तासात राज्यात 190 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
57,225 जणांची कोरोना चाचणी
राज्यात ज्याप्रमाणात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे, त्या प्रमाणात कोरोना चाचणी करण्याचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. शनिवारी राज्यात 41,150 नागरिकांच्या टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 12,666 जण कोरोनाबाधित आढळून आले.