नवी दिल्ली: ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हॅरिएंट (corona virus new variant) समोर आल्यानंतर देशाला संभाव्य धोक्यापासून वाचवण्यासाठी केंद्र सरकारे सगळ्या राज्यांना तसेच केंद्र शासित प्रदेशांना आपआपल्या भागातील परस्थितीवर सखोल नियंत्रण, पाळत संवेदनशील स्थळांची देखरेख, चांगल्या प्रकारच्या तपासण्या, लसीकरण मोहीमांचा वेग वाढवणे तसेच आरोग्याच्या पायाभूत सुविधा सुधारण्यावर लक्ष केद्रीत करण्याच्या सुचना केल्या आहेत सोबतच परदेशी प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्व जारी केले आहेत.
1 डिसेंबर पासून अंमलबजालणी
केद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी नव्याने तयार केलेल्या निर्देशा नुसार ही नियमावली 1 डिसेबर पासून आंमलात आणली जाणार आहे. परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना आधी एयर सुविधा पोर्टल (Air Suvidha portal) वर आरटी-पीसीआर चा प्रवासी निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट अपलोड करावा लागणार आहे. तसेच पुढील 14 दिवसाच प्रवासाचा तपशिल ही द्यावा लागणार आहे.
'त्यां'ना करावी लागणार टेस्ट
आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशा नुसार ज्या देशामधे या व्हेरीयंटचा प्रसार होत आहे अशा धोकादायक देशातुन येणाऱ्या प्रवाशांना भारतात आल्या नंतर येथे कोविड चाचणी करावी लागणार आहे. आणि त्याचा रिपोर्ट येई पर्यंत विमानतळावरच वाट पहावि लागणार आहे. यात जर प्रवाशाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर त्याला 7 दिवसा करता होम क्वारंटाइन रहावे लागणार आहे. 8 व्या दिवशी त्याची पुन्हा चाचणी केली जाणार आहे. त्यातही टेस्ट निगेटिव्ह आली तर स्व-निरीक्षणात (self-monitor) रहावे लागणार आहे.
14 दिवस स्व:निरीक्षणात
कोरोनाचा प्रसार जास्त असलेल्या देशा शिवाय इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळाबाहेर जाण्याची परवाणगी आहे. पण त्यांना 14 दिवसांकरता स्व-निरीक्षणात रहावे लागणार आहे. सहभागी असलेल्या प्रवाशांच्या एका गटातील म्हणजे एकुण प्रवासातील 5 टक्के प्रवाशांची विमानतळावरच ऐच्छीक(random) कोरोना चाचणी केली जाणार आहे.
समुद्री मार्गाने येणाऱ्या प्रवाशांसाठी
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Union Health Secretary Rajesh Bhushan) यांनी विदेशातून समुद्री मार्गाने येणाऱ्या प्रवाशांसाठी पण निर्देश जारी केले आहेत त्यानुसार अशा प्रवाशांवर कठोर देखरेख ठेवण्यावर जोर दिला असून कोविड नियमाचे पालन करण्यास सांगितले आहे.
हे ही वाचा - Omicron Variant : चिंताजनक! दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवली आलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह