ETV Bharat / bharat

Conversion Through Gaming App: ठाणे न्यायालयाकडून आरोपी शाहनवाझ खानला तीन दिवसाची ट्रान्झिट रिमांड - GAMING APP द्वारे धर्मांतर

गेमिंग अॅपद्वारे धर्मांतर केल्याप्रकरणी महाराष्ट्रातून अटक करण्यात आलेल्या आरोपी बद्दोला गाझियाबादला नेण्यात येणार आहे. पोलीस त्याचा ट्रान्झिट रिमांड मागणार आहेत, जेणेकरुन याप्रकरणी सविस्तर चौकशी करता येईल. दरम्यान, आरोपी बद्दोला महाराष्ट्रातील ठाणे येथील न्यायालयात हजर करण्यात आले.

बद्दोचा ट्रान्झिट रिमांड
बद्दोचा ट्रान्झिट रिमांड
author img

By

Published : Jun 12, 2023, 1:07 PM IST

Updated : Jun 12, 2023, 1:19 PM IST

मुंबई : गेमिंग अॅपद्वारे धर्मांतर केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांसोबत संयुक्त कारवाईक करत युपी पोलिसांनी बद्दो उर्फ शाहनवाजला रविवारी अटक केली. आरोपी बद्दोला गाझियाबादला येण्यात येणार आहे, ठाणे न्यायालयाने युपी पोलिसांची ट्रान्झिट रिमांड विनंती मान्य केली आहे. न्यायालायाने तीन दिवसांची म्हणजेच 15 जूनपर्यंत ट्रान्झिट रिमांड दिला आहे. धर्मांतर प्रकरणात आरोपींची सखोल चौकशी करुन आणखी नवीन खुलासे काढून घेण्यासाठी युपी पोलिसांनी बद्दोची ट्रान्झिट रिमांड मागितली होती.

ट्रान्झिट रिमांड का : गाझियाबाद पोलीस महाराष्ट्रातील बद्दोच्या ट्रान्झिट रिमांडसाठी प्रयत्न करणार असून त्याला लवकरात लवकर गाझियाबादला नेण्यात येणार आहे. दुपारी एक वाजात बद्दोला ठाणे येथील न्यायालयात हजर केले गेले. त्यानंतर न्यायालयाने युपी पोलिसांची रिमांडची विनंती मान्य केली. गाझियाबाद पोलिसांना पुढील चौकशीसाठी बद्दोला लवकरात लवकर गाझियाबादमध्ये घेऊन जायचे आहे. आरोपीला गाझियाबादला परत आणण्यासाठी सर्व औपचारिकता पोलिसांनी पूर्ण केल्या आहेत. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर बद्दोला गाझियाबादला नेले जाईल, जेणेकरून चौकशीतून अजून त्याच्या कटकारस्थानाविषयीची नवीन माहिती समोर येईल. याप्रकरणातील आणखीन नवीन खुलासे समोर येतील.

  • #WATCH | Maharashtra: Shahnawaz Khan alias Baddo, a resident of Mumbra, who was wanted by Ghaziabad police in an alleged online gaming and conversion racket, was taken to Thane Court from Mumbra Police Station. pic.twitter.com/nt2lzgdmnq

    — ANI (@ANI) June 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोण-कोण आहे सहभागी : या प्रकरणाचे तार दुबईशीही जोडलेले असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. याशिवाय विदेशी निधीची बाबही समोर आली आहे. पोलिसांना अनेक बँक खातीही मिळाली आहेत. त्याचबरोबर काही बेकायदेशीर अॅप्सच्या माध्यमातून लहान मुलांना शिकार बनवण्याचे प्रकरणही समोर आले आहे. बद्दोने आतापर्यंत किती मुलांचे धर्मांतर केले आहे, हे जाणून घेणे पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण आतापर्यंत शेकडो मुलांचे धर्मांतर झाल्याच्या बातम्या पोलिसांपर्यंत आल्या आहेत. दरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या मौलवी अब्दुल रहमाननेही अनेक खुलासे केले आहेत. याशिवाय अब्दुल रहमानकडून बद्दोबाबतही बरीच माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र या संपूर्ण रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर सर्व लोकांपर्यंत कायद्याचे हात पोहोचतील का यात यश मिळेल का हे पोलिसांसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.

हेही वाचा -

  1. conversion : पाचवेळा जिमला जायचा मुलगा, बापाने पाठलाग करताच समोर आला धर्मांतराचा सापळा
  2. UP Crime News : आधी प्रेमाच्या जाळ्यात फसवले, मग धर्मांतर करून केला विकण्याचा प्रयत्न ; पोलिसांकडून टोळीचा भंडाफोड

Last Updated : Jun 12, 2023, 1:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.