स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर Freedom fighter Vinayak Damodar Savarkar यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान फार मोठे आहे. तथापि, त्यांच्या संदर्भातील विविध विषयांवरून देशात सातत्याने वाद सुरू असतात. आता कर्नाटकमधील शालेय पुस्तकातील धड्यावरून नवा वाद New Controversy Over Lesson In School Book सुरू झाला आहे. सावरकर ज्या सेल्युलर जेलमध्ये होते तिथून ते बुलबुल पक्ष्याच्या पंखांवर बसून दररोज मातृभूमीचे दर्शन घेण्यासाठी येत असत, असा उल्लेख या धड्यात आहे. त्यावरुन वादंग माजले आहे. सावरकरांवरील धड्यावरून वाद पेटला असून आता सोशल मीडियावर हा विषय व्हायरल होत आहे.
2022 मध्ये रोहित चक्रतीर्थ समितीने केलेल्या उजळणी मजकुरात सावरकरांवरील मजकूर जोडण्यात आला आहे. हा तपशील के.टी.गट्टी यांच्या कलावानू गेद्दावरू या धड्यात आहे. ज्यामध्ये सावरकरांचे अंदमान तुरुंगातील वास्तव्य, त्यांना झालेली शिक्षा आणि त्यांचे संघर्ष यांचा तपशील आहे. मात्र यामध्ये सावकरांना ठेवण्यात आलेल्या अंदमान सेल्युलर जेलमध्ये दररोज एक बुलबुल पक्षी त्यांच्या कोठडीत येत असे आणि सावकर त्याच्या पंखावर बसून दररोज मायदेशी जात असत, असा उल्लेख आहे. अंदमान सेल्युलर जेलची ही कोठडी पूर्ण बंद होती की, प्रकाशही या कोठडीत शिरत नसे. असे असताना बुलबुल कसा येत होता आणि सावरकर त्याच्या पंखांवर बसून कसे जात होते, असा प्रश्न करीत सोशल मीडियावर प्रश्न विचारले जात आहेत. यावरून कर्नाटकातील भाजप सरकारवर आगपाखड केली जात आहे.
लेखक के टी गट्टी यांनी सावरकरांना अंदमानातील ज्या सेल्युलर जेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणी दिलेल्या भेटीवर आधारित हा धडा त्यांनी लिहीला आहे. सावरकरांना येथे किती त्रास सहन करावा लागला, किती यातना भोगाव्या लागल्या याचा उल्लेख या धड्यामध्ये देण्यात आला आहे. परंतु ते लिहित असतानाच लेखकाने सावरकरांच्या मातृभूमीच्या प्रेमावरून काल्पनिकतेची जोड देऊन हा प्रसंग चितारला आहे. त्यामध्ये त्यांनी बुलबुल पक्षी येथे रोज येत असे आणि त्याच्या पंखांवरून सावरकर आपल्या मातृभूमीला दररोज भेटत असत, असे वर्णन केले आहे. यावरून आता वाद पेटला आहे. विरोधी पक्षांनी भाजपला धारेवर धरले आहे.