नवी दिल्ली Controversial Remark On Pm Modi : संसदेच्या विशेष अधिवेशनात भाजपा खासदार रमेश बिधुरी यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. मात्र रमेश बिधुरी यांनी अपशब्द वापरल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी खासदारांची माफी मागितली होती. या वादात आता भाजपाचे झारखंडमधील गोड्डाचे खासदार निशिकांत दुबे यांनी उडी घेतली आहे. दानिश अली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm Narendra Modi ) यांच्यावर वादग्रस्त टीका करुन रमेश बिधुरी यांना भडकावण्यात आलं आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकसी करण्याची मागणी निशिकांत दुबे यांनी केली आहे.
-
#WATCH | Delhi: On BJP MP Ramesh Bidhuri's remark, BJP MP Nishikant Dubey says "...The words used by him are not acceptable. I was present in the Parliament when all this took place. BSP MP Danish Ali kept calling PM Modi 'neech'. I have written a letter to Lok Sabha Speaker Om… pic.twitter.com/TIg4A9bc1a
— ANI (@ANI) September 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Delhi: On BJP MP Ramesh Bidhuri's remark, BJP MP Nishikant Dubey says "...The words used by him are not acceptable. I was present in the Parliament when all this took place. BSP MP Danish Ali kept calling PM Modi 'neech'. I have written a letter to Lok Sabha Speaker Om… pic.twitter.com/TIg4A9bc1a
— ANI (@ANI) September 23, 2023#WATCH | Delhi: On BJP MP Ramesh Bidhuri's remark, BJP MP Nishikant Dubey says "...The words used by him are not acceptable. I was present in the Parliament when all this took place. BSP MP Danish Ali kept calling PM Modi 'neech'. I have written a letter to Lok Sabha Speaker Om… pic.twitter.com/TIg4A9bc1a
— ANI (@ANI) September 23, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त टीका : समाजवादी पक्षाचे खासदार दानिश अली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केल्याचा दावा खासदार निशिकांत दुबे यांनी केला. दानिश अली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'निच' म्हटल्याचा आरोप निशिकांत दुबे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अपमानास्पद टीका केल्यानंतर दानिश अली यांनी रमेश बिधुरी यांना चिथावणी दिल्याचा आरोप निशिकांत दुबे यांनी केला.
लोकसभा अध्यक्षांना लिहिलं पत्र : खासदार दानिश अली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याचा दावा भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला. पंतप्रधानांविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्यानं अशीच प्रतिक्रिया येईल, असंही निशिकांत दुबे यांनी यावेळी सांगितलं. या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आपण लोकसभा अध्यक्षांकडं केल्याची माहिती निशिकात दुबे यांनी दिली. यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
भगवान रामाच्या अस्तित्वावर केले प्रश्न उपस्थित : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात निशिकांत दुबे यांनी दानिश अली प्रकरणात चौकशीची मागणी केली. रमेश बिधुरी यांना भडकावण्यात सौगता रॉय यांच्या भाषणाचाही हात असल्याचा दावा खासदार निशिकांत दुबे यांनी यावेळी केला. सौगता रॉय यांनी संसदेत केलेल्या भाषणात भगवान रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केला. दानिश अली यांच्यासह द्रमुख आणि टीएमसीचे खासदार हे सवयीचे गुन्हेगार असल्याचा आरोप निशिकांत दुबे यांनी आरोप केला. हे खासदार भाजपा खासदारांना भडकावण्यासाठी चिथावणी देण्यासाठी अपमानास्पद टीका करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :