ETV Bharat / bharat

भाजपच्या 'काँग्रेसमुक्त भारत अजेंड्या'साठी आरएसएसकडून 'आम आदमी पक्षा'ची निर्मिती - काँग्रेस - Aam Aadmi Party News

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, आम आदमी पक्षाची नेमकी गोवा आणि काँग्रेसविषयी भावना जाणून घेण्यासाठी 'आप' भाजपला खरोखरच पराभूत करू इच्छित असेल आणि त्यांचा उद्देश स्पष्ट असेल तर काँग्रेस चर्चा करण्यास तयार आहे, असे म्हटले होते. मात्र, त्यानंतर त्यांच्या दिल्लीतील वरिष्ठांच्या प्रतिक्रिया पाहता काँग्रेसने उभारी घेऊ नये, म्हणजे भाजपच्या काँग्रेस मुक्त भारत अजेंड्याच्या पूर्ततेसाठी आरएसएसने त्याचे निर्माण केले आहे, हे स्पष्ट होते.

गोवा गिरीश चोडणकर न्यूज
गोवा गिरीश चोडणकर न्यूज
author img

By

Published : Jan 10, 2021, 8:03 PM IST

पणजी - आम आदमी पक्ष काँग्रेसच्या उभारणीवेळी वारंवार अडथळा बनून पुढे येतो. त्यांच्या नेत्यांच्यी वक्तव्ये आणि कृती यांचा अभ्यास करता स्पष्ट झाले आहे की, भाजपच्या काँग्रेस मुक्त भारत अजेंड्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 'आम आदमी पक्षाची' स्थापना केली आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

पणजीतील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, आम आदमी पक्षाची नेमकी गोवा आणि काँग्रेसविषयी भावना जाणून घेण्यासाठी 'आप' भाजपला खरोखरच पराभूत करू इच्छित असेल आणि त्यांचा उद्देश स्पष्ट असेल तर काँग्रेस चर्चा करण्यास तयार आहे, असे म्हटले होते. युती धुडकावतच त्यानंतरच्या तासाभरातील त्यांच्या आणि त्यांच्या दिल्लीतील वरिष्ठांच्या प्रतिक्रिया पाहता काँग्रेसने उभारी घेऊ नये, म्हणजे भाजपच्या काँग्रेस मुक्त भारत अजेंड्याच्या पूर्ततेसाठी आरएसएसने त्याचे निर्माण केले आहे, हे स्पष्ट होते.

भाजपच्या 'काँग्रेसमुक्त भारत अजेंड्या'साठी आरएसएसकडून 'आम आदमी पक्षा'ची निर्मिती - काँग्रेस

हेही वाचा - दिल्लीत उभी राहणार कोकणी अकादमी, केजरीवाल सरकारचा निर्णय

त्याशिवाय आपचे यापूर्वीचे संयोजक असलेले एल्विस गोम्स यांनीही तसे स्पष्ट करत पक्ष सोडला होता. आम्ही पक्षाला नवी उभारी देण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये आप मोठा अडथळा बनून पुढे येतो. परंतु, आता हा अडथळा दूर करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते काम करत असून बूथ कमिटी तयार करण्यावर भर दिला जात आहे. आप सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांना गोव्याचे राजकारण बदलण्याचा स्पष्ट उद्देश असेल तर, त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

सरकारच्या कृतीचा निषेध

ज्या लोकांचा प्रकल्पांना लोकांचा विरोध आहे. तेथे सरकार लोकशाही पद्धतीने चर्चा करून प्रश्न न सोडवता पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करत आहे. सरकार असंवेदनशील आहे. मानवी हक्कांची पायमल्ली करत आहे, या सरकारच्या कृतीचा काँग्रेस निषेध करते, असे सांगून चोडणकर म्हणाले, गोव्यात काँग्रेस सत्तेत असताना लोकांच्या आंदोलन करण्याचा हक्क कधीच डावलला गेला नव्हता. त्यामुळे गोमंतकीय आता काँग्रेस सरकारची आठवण काढताना दिसतात. आम्ही सरकारकडे मागणी करतो की, त्यांनी पोलिसांवर नियंत्रण ठेवावे. पोलिस कायदा हातात घेत आहेत. तर सरकार जमिनी हडप करण्यासाठी पोलीसबळाचा दुरुपयोग करत आहे. पोलिसांनी नागरिकांवर खुनी हल्ल्याचा प्रयत्न करू नये. तसेच मेळावळी आंदोलन प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र वेलिंगकर यांना अटक करून ज्याप्रकारे पोलिस कोठडीत मारहाण करण्यात आली, त्याच्या त्यांच्या आरोग्यावर काय दूरगामी परिणाम होईल याची चौकशी करण्यासाठी डॉक्टरांची समिती तयार करावी. सदर समितीचा अहवाल जनतेसमोर ठेवावा, अशी मागणी चोडणकर यांनी केली.

काँग्रेस सोडून भाजपात गेलेल्यांना पुन्हा प्रवेश नाही

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या संख्येने जागा मिळवता आल्या नाहीत. तरीही, विधानसभा मतदारसंघाचा विचार करता मताधिक्य वाढले आहे, असे सांगून चोडणकर म्हणाले, पुढील विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना पक्ष अधिक मजबूत करण्यात येत आहे. बूथ स्तरावर काम सुरू आहे. अशा वेळी पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांपैकी कोणालाही पुन्हा पक्षात प्रवेश नाही. पक्षाकडे दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीचे कार्यकर्ते आहेत. तसेच इच्छुक उमेदवारही आहेत. निवडणुकीत कोणाशी युती करावी, याचा विचार हाय कमांडकडून करण्यात येईल, असेही चोडणकर यांनी सांगितले.

हेही वाचा - काही चुकीच्या लोकांमुळे राजकारण्यांची प्रतिमा मलीन होत आहे - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.