नवी दिल्ली - नॅशनल हेराल्ड प्रकरणी ED'ने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना अनेकदा समन्स बजावले आहेत. आता या मुद्द्यावर काँग्रेस आज देशभर पत्रकार परिषद ( Press Conference )घेणार आहे. याशिवाय काँग्रेसने यासाठी ईडी कार्यालयावर निदर्शने आणि मोर्चा काढण्याचीही तयारी केली आहे. विविध राज्यांमध्ये सर्वपक्षीय नेत्यांवर पत्रकार परिषदांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ( Congress Press Conference Across The Country ) यावेळी सर्व काँग्रेस नेते सरकारी यंत्रणांच्या कारवाईसाठी केंद्र सरकारवर हल्लाबोल करणार आहेत.
-
Congress to demonstrate political show of strength on Monday against ED summons to Rahul Gandhi
— ANI Digital (@ani_digital) June 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/8hL2lybQVc#RahulGandhi #SoniaGandhi #EnforcementDirectorate #Congress #NationalHeraldCase pic.twitter.com/VI43o8ihWJ
">Congress to demonstrate political show of strength on Monday against ED summons to Rahul Gandhi
— ANI Digital (@ani_digital) June 12, 2022
Read @ANI Story | https://t.co/8hL2lybQVc#RahulGandhi #SoniaGandhi #EnforcementDirectorate #Congress #NationalHeraldCase pic.twitter.com/VI43o8ihWJCongress to demonstrate political show of strength on Monday against ED summons to Rahul Gandhi
— ANI Digital (@ani_digital) June 12, 2022
Read @ANI Story | https://t.co/8hL2lybQVc#RahulGandhi #SoniaGandhi #EnforcementDirectorate #Congress #NationalHeraldCase pic.twitter.com/VI43o8ihWJ
ईडीच्या समन्सबाबत काँग्रेस नेते सचिन पायलट लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. ( National Herald Case ) त्यांच्याशिवाय रायपूरमध्ये विवेक तंखा, सिमल्यात संजय निरुपम, चंदिगडमध्ये रणजीत रंजन, अहमदाबादमध्ये पवन खेडा, डेहराडूनमध्ये अलका लांबा, पाटण्यात नासिर हुसेन, गोव्यात मधु गौर. ज्या राज्यांमध्ये राष्ट्रीय नेते पोहोचणार नाहीत, तेथे स्थानिक नेते पत्रकार परिषद घेणार आहेत.
याशिवाय सोमवारी काँग्रेस देशभरात निदर्शने करणार आहे. ईडीच्या कारवाईविरोधात हे निदर्शने करण्यात येणार आहे. त्याचवेळी दिल्लीतील पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्यासोबत ईडी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. आज अलका लांबा डेहराडून येथील स्टेट ऑफिसमध्ये दुपारी 12.15 वाजता पत्रकार परिषद करतील, राज्यसभा खासदार डॉ. सय्यद नसीर हुसेन राज्य काँग्रेस मुख्यालय सदकत आश्रम पटना येथे दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. तर, सचिन पायलट दुपारी 3 वाजता 10-मॉल एव्हेन्यू येथील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत.
नॅशनल हेराल्ड मनी लाँडरिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना 23 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. सोनीया (वय, 75) यांना यापूर्वी 8 जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु, त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी ED'कडे हजर राहण्यासाठी नवीन तारीख मागितली होती.
या प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही १३ जून रोजी चौकशी होऊ शकते. राहुल यांना यापूर्वी 2 जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, ते परदेश दौऱ्यावर असल्याने त्यांनी नवीन तारीख मागितली होती. ED'ने त्यांना १३ जून रोजी हजर राहण्यासाठई समन्स बजावले आहे.
हेही वाचा - Sonia Gandhi In Hospital: सोनीया गांधी यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल