पणजी - गोव्याचे विरोधी पक्षनेते मायकल लोबो ( Michael Lobo) यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला ( Goa Congress Crisis ) मोठा धक्का बसला होता. त्यानंतर काँग्रेसने आमदार युरी आलेमाव (Congress MLA Yuri Alemao Selected As A Leader of Opposition) यांची गोवा विधानसभेचे नवे विरोधी पक्षनेते करण्याची एकमुखी मागणी विधानसभा सभापतीकडे ( Goa Assembly Speaker ) केली होती. त्यावर विधानसभा सभापती रमेश तवडकर ( Goa Assembly Speaker Ramesh Tawadkar ) यांनी युरी आलेमाव यांची गोवा विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड केली आहे.
सहा महिन्यापासून होते पद रिक्त मायकल लोबो यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ( Goa Chief Minister Pramod Sawant ) यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते पद ( Opposition Leader) गेल्या सहा महिन्यापासून रिक्त होते. अनेक आमदारांनी एकाचवेळी काँग्रेसला सोडचिठ्ठी ( Goa Congress Crisis ) देत भाजपचा रस्ता पकडल्याने काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आता युरी अलेमाव ( Congress MLA Yuri Alemao Selected As A Leader of Opposition ) यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.