ETV Bharat / bharat

Nav Sankalp Shivir : चिंतन शिबिरासाठी राहुल गांधी पोहोचले उदयपूरला, गहलोत यांनी केले भव्य स्वागत

नवसंकल्प शिबिरात सहभागी होण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी उदयपूरमध्ये ( Congress leader Rahul Gandhi reached Udaipur) पोहोचले. स्टेशनवर राजस्थानी संस्कृतीनुसार त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह सर्व दिग्गजांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

Nav Sankalp Shivir
राहुल गांधी पोहोचले उदयपूरला
author img

By

Published : May 13, 2022, 8:28 AM IST

उदयपूर - राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तीन दिवसीय चिंतन शिबिर आजपासून सुरू ( Nav Sankalp Shivir ) होणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या बहुतांश नेत्यांसह राहुल गांधी दिल्लीहून ट्रेनने उदयपूरला पोहोचले ( Congress leader Rahul Gandhi reached Udaipur) आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचे सुमारे 74 नेतेही उपस्थित आहेत.

राहुल गांधी पोहोचले उदयपूरला

राहुल गांधी उदयपूरला पोहोचले - राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तीन दिवसीय चिंतन शिबिर आजपासून सुरू होणार असून त्यात सहभागी होण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या बहुतांश नेत्यांसह राहुल गांधी दिल्लीहून ट्रेनने उदयपूरला पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचे सुमारे 74 नेतेही उपस्थित आहेत. मेवाड एक्स्प्रेसमध्ये राहुल गांधींसह सर्व नेत्यांसाठी दोन डबे आधीच तयार करण्यात आले होते.दिल्लीतील सराई रोहिल्ला ते इतर अनेक स्थानकांवर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी राहुल गांधींचे स्वागत केले.लोकांच्या समस्याही ऐकून घेतल्या. राहुल गांधींच्या स्वागतासाठी काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेतेही रेल्वे स्टेशनवर पोहोचले आहेत. तीन दिवसांच्या अखंड चिंतनानंतर काँग्रेस पक्षाला नव्या संकल्पनेसह पुढे नेण्याच्या तयारीत आहे.राहुल गांधींच्या स्वागतासाठी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी जोरदार तयारी केली होती.

राहुल गांधी पोहोचले उदयपूरला

राहुल गांधी ताज अरावली हॉटेलकडे रवाना - उदयपूर रेल्वे स्थानकावर स्वागत केल्यानंतर राहुल गांधी बसमध्ये चढले आणि ताज अरावली हॉटेलकडे रवाना झाले. राहुल गांधींसोबत सीएम अशोक गेहलोत बसमध्ये पुढच्या सीटवर बसले आहेत. त्यांच्या मागे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल बसले आहेत. रेल्वे स्टेशनवरून बस निघाली आहे.

एकापाठोपाठ एक राज्य निवडणुकांमध्ये पराभवाने त्रस्त झालेल्या काँग्रेसने राजस्थानमधील उदयपूरमध्ये चिंतन शिविराचे आयोजन केले आहे. काँग्रेसचे हे चिंतन शिबिर आजपासून तीन दिवस चालणार आहे. सलग पराभवावर काँग्रेस येथे तीन दिवस विचारमंथन करणार आहे. चिंतन शिबिरात काँग्रेसचे संपूर्ण लक्ष संघटनेत बदल आणि पुढील लोकसभा निवडणुकीच्या कृती आराखड्यावर असेल.

चिंतन शिविराची सुरुवात सोनिया गांधींच्या संबोधनाने होणार - दुपारी 2 वाजता सोनिया गांधींच्या संबोधनाने चिंतन शिबिराची सुरुवात होईल. यामध्ये काँग्रेसचे चारशेहून अधिक नेते सहभागी होणार आहेत. आज आणि उद्या सायंकाळपर्यंत विविध विषयांवर विविध गटांमध्ये चर्चेची फेरी होणार आहे. त्यानंतर जो प्रस्ताव तयार होईल, त्यावर १५ मे रोजी होणाऱ्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.

हेही वाचा - 14 मे च्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला मैदान कमी पडेल - अनिल परब

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.