लखनौ - काँग्रेसच्या आक्रमकतेमुळे व जनतेच्या वाढत्या दबावापुढे यूपीतील योगी सरकारने एक पाऊल मागे घेत राजकीय नेत्यांना लखीमपूरला जाण्याची परवानगी दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशिवाय आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनाही लखीमपूरला भेट देण्याची परवानगी देण्यात आली आहे. राहुल गांधींनी लखनौला जाण्यासाठी काही वेळापूर्वी दिल्ली विमानतळ सोडले आहे. पंजाब आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्रीही राहुल यांच्यासोबत जात आहेत. काँग्रेसचे तिन्ही नेते लखीमपूर खेरीच्या पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील.
LIVE UPDATE-
- मोठ्या पोलीस बंदोबस्तात राहुल गांधी लखनौ विमानतळावरून सीतापूरमध्ये दाखल झाले आहेत. तेथून ते प्रियंका गांधींना सोबत घेऊन लखीमपूर खेरीकडे रवाना होतील.
- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश सिंह बघेल यांना लखीमपूरकडे जाण्यास परवानगी मिळाली आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात राहुल गांधी एअरपोर्टवरून सीतापूरकडे रवाना झाले आहेत.
- छत्तीसगडचे सीएम भूपेश बघेल यांनी लखीमपूर मध्ये बळी गेलेल्या पत्रकारासह सर्व लोकांना आपल्या सरकारच्या वतीने 50 लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनीही पंजाब सरकारकडून मृतांना 50 लाखांची मदत देण्याची घोषणा केली.
-राहुल गांधी व चौधरी चरण सिंह एयरपोर्टवर दुपारी पावणे एक वाजता आले होते. राहुल आपल्या गाडीने सीतापूरला जाणार होते. मात्र प्रशासन यावर अडून राहिले की, राहुल गांधींनी पोलिसांच्या गाडीतूनच सीतापूरला जावे. त्यानंतर बघेल व चण्णी या दोन मुख्यमंत्र्यांसह राहुल गांधींनी विमानतळावरच धरने दिले. यावेळी काँग्रेस समर्थक मोठ्या संख्यने एकवटले होते. त्यानंतर अचानक राहुल गांधी उठले व आपल्या गाडीत जाऊन बसले. त्यांच्यापाठोपाठ दोन्ही मुख्यमंत्रीही गाडीने सीतापूरकडे रवाना झाले.
-
State government has given permission to Congress leaders Rahul Gandhi, Priyanka Gandhi and three other people to visit Lakhimpur Kheri: Home Department, UP Government pic.twitter.com/sXOquXOkvJ
— ANI UP (@ANINewsUP) October 6, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">State government has given permission to Congress leaders Rahul Gandhi, Priyanka Gandhi and three other people to visit Lakhimpur Kheri: Home Department, UP Government pic.twitter.com/sXOquXOkvJ
— ANI UP (@ANINewsUP) October 6, 2021State government has given permission to Congress leaders Rahul Gandhi, Priyanka Gandhi and three other people to visit Lakhimpur Kheri: Home Department, UP Government pic.twitter.com/sXOquXOkvJ
— ANI UP (@ANINewsUP) October 6, 2021
सीएम योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या झालेल्या उच्च स्तरीय बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लखीमपूर खीरीला जाण्याची परवानगी मिळाली आहे. त्याचबरोबर सीतापूर पीएसी ऑफिसमध्ये बनवलेल्या तात्पुरत्या तुरुंगात प्रियंका गांधीशी राहुल गांधींना भेटण्याची परवानगी मिळाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य सचिव राजेंद्र कुमार तिवारी, डीजीपी मुकुल गोयल, अप्पर मुख्य सचिव गृह अवनीश अवस्थी सह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली.
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे एका कार्यक्रमानिमित्ताने लखीमपूर खेरी या ठिकाणी येणार होते. पण त्याआधीच केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं. ज्यावेळी केंद्रीय मंत्र्यांचा गाडीचा ताफा या ठिकाणी आला त्यावेळी मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
काँग्रेसच्या 5 सदस्यीय प्रतिनिधिमंडळला प्रियंका गांधींना भेटण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. त्यानंतर पोलिसांनी राहुल गांधींना लखनौ विमानतळावर रोखण्याची तयारी करण्यात आली होती. त्यानंतर दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी लखनौकडे रवाना झाले. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. त्यानंतर राहुल गांधींना लखीमपूर खेरी व सीतापूरल जाण्याची परवानगी देण्यात आली.