लखनौ - आग्राला जाण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्या ताफ्याला लखनौमध्येच रोखण्यात आले आहे. प्रियंका या लखनौवरून आग्राच्या दिशेने जात होत्या. प्रियंका गांधींच्या ताफ्यात रोखण्यात आल्याने काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पोलिसांमध्ये वाद झाला. पोलिसांनी प्रियंका गांधींना ताब्यात घेतले आहे.
काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी या लखनौवरून आग्र्याच्या दिशने जात असताना आग्रा एक्सप्रेसवर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते. पोलिसांनी प्रियंका गांधींना रोखल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली. पोलिसांनी सौम्य बळाचा प्रयोग करत काँग्रेस कार्यकर्त्यांना दूर केले.
काँग्रेस कार्यकर्त्यांचा पोलिसांबरोबर झाला होता-
प्रियंका गांधी या मृत अरुण वाल्मिकी यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आग्रा येथे जात होत्या. प्रियंका गांधींना महामार्गावरच रोखण्यात आल्याने काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्यासमवेत आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पोलिसांसोबत वाद केला. प्रियंका गांधी कारमधून रस्त्यावर उतरल्या. त्यानंतर प्रियंका या पोलीस कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचल्या. आग्रा येथे जाऊ नये, याकरिता पोलिसांकडून सातत्याने प्रियंका गांधी यांना विनंती करण्यात आली.
हेही वाचा-अरे देवा! किडनी स्टोन काढण्याऐवजी डॉक्टरांनी किडनीच काढली
दरवेळेस कलम 144 लागू केल्याचे सांगण्यात येते-
प्रियंका गांधींनी योगी सरकावर निशाणा साधला. प्रियंका म्हणाल्या, की कोणत्या कारणामुळे मला प्रशासनाने रोखले आहे? मी संपूर्ण दिवस गेस्ट हाऊसमध्ये बसावे, अशी प्रशासनाची इच्छा दिसत आहे. मला केवळ काँग्रेस कार्यालयात जाण्याची परवानगी आहे. मी कुठेही गेले तरी मला रोखण्यात येत आहे. दरवेळेस कलम 144 लागू केल्याचे सांगण्यात येते. हा कायदा व व्यवस्थेचा प्रश्न असल्याचे सांगितले जाते. मी पंतप्रधानांच्या रॅलीत जात नाही. तिथे हजारो लोक बसलेले असतात. तिथे 144 कलम लागू नसते.
हेही वाचा-Lakhimpur Violence: लखीमपूर हिंसाचार प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, आज लागणार निकाल?
लखीमपूर येथेही जाण्यास पोलिसांनी रोखले होते-
दरम्यान, लखीमपूर येथे शेतकऱ्यांना वाहनाने चिरडल्यानंतर देशभरात संतापाची भावना निर्माण झाली होती. प्रियंका गांधी या लखनौवरून लखीमपूर जाताना पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. सीतापूर सीमेवर तीन दिवस पोलिसांनी त्यांना ताब्यात ठेवले. अखेर योगी सरकारने लखीमपूर घटनेतील पीडित शेतकरी कुटुंबांना भेटण्याची परवानगी दिली होती.