ETV Bharat / bharat

Ashok Gehlot: कर्नाटमध्ये तर येणारचं त्यानंतर राजस्थानमध्येही काँग्रेसचीच सत्ता येणार -गहलोत - Bharti University

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आज मतदान पार पडले. येत्या 13 मे रोजी निकाल हे जाहीर होणार आहे. कर्नाटकमध्ये कोणाची सत्ता येणार याबाबत सर्वच पक्ष हे आपापल्या पद्धतीने दावे करत आहेत. अश्यातच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी याबाबत विचारले असता ते म्हणाले, की कर्नाटकमध्ये आमचा पक्ष हा विजयी होणार आहे. आणि आमची सरकार हे पूर्ण बहुमतने येईल अस यावेळी गेहलोत म्हणाले आहेत. तसेच राजस्थानमध्ये देखील पुन्हा आमचे सरकार येईल असा विश्वास त्यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला आहे.

Ashok Gehlot
Ashok Gehlot
author img

By

Published : May 10, 2023, 10:01 PM IST

पुणे : भारती विद्यापीठाचा ५९ वा वर्धापन दिन समारंभ कार्यक्रम भारती विद्यापीठ संकुल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी बोलताना कर्नाटकमध्ये आमचे सरकार येणार आहे. तसेच, राजस्थानमध्ये देखील पुन्हा आमचेचं सरकार येईल असाही विश्वास त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

आम्ही सर्व कामगार यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली : राजस्थानमध्ये पुन्हा आमची सरकार येणार आहे. कारण आम्ही गुड गव्हर्नर म्हणून काम केलं आहे. पंतप्रधान हे त्यांच्या नेत्यांच्या बोलण्यावर बोलत आहे. आम्ही पाच वर्षात जे आम्ही प्रोजेक्ट केले आहे. ते प्रोजेक्ट वेगवेगळे राज्य आत्ता अमलात आणत आहे. आज आम्ही भारताला विश्र्वगुरू बनवत आहोत. पण भारत तेव्हा विश्र्वगुरू बनेल जेव्हा या देशातील नागरिक हा सुरक्षित राहील. आज आम्ही सर्व कामगार यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे. प्रत्येक घर सुरक्षित करण्याचं काम करत आहे असही यावेळी गेहलोत म्हणाले आहेत.

महागाई कमी केली जात आहे : राजस्थानमध्ये देखील काही महिन्यांमध्ये निवडणूक होणार आहे. अस असल तरी येथील सत्ताधारी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांच्यामधील संघर्ष हा तीव्र होत चालला आहे. यावर गेहलोत यांना विचारलं असता ते म्हणाले की ते जाऊ द्या, आज आम्ही राजस्थानमध्ये महागाई कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या इथ 10 योजना अश्या आहे की ज्यामाध्यमातून महागाई कमी केली जात आहे. आत्तापर्यंत 3 करोड कार्ड हे वाटण्यात आले आहे. जे कॅम्प सरकारच्या माध्यमातून लावले जात आहे तिथं मी प्रत्येक ठिकाणी भेट देत आहे अस देखील यावेळी गेहलोत म्हणाले आहेत. दरम्यान, यावेळी त्यांना सचिन पायलट यांच्याबाबतीत विचारलं असता ते म्हणाले की आम्ही सध्या महागाई कमी करण्यावर भर देत आहोत.

हेही वाचा : Karnataka Election 2023 : कर्नाटकात शांततेत पार पडले मतदान! 13 मे रोजी होणार फैसला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.