वाराणसी - काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी आज वाराणसी दौऱ्यावर आहेत. त्या आयोजीत शेतकरी रॅलीत सहभागी होणार आहेत. दरम्यान, त्यांचे येथील बाबतपूर विमानतळावर आगमन झाले आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू, अजय राय, प्रमोद तिवारी आदी नेत्यांनी प्रियंका यांचे स्वागत केले आहे.
प्रियंका यांच्या शेतकरी रॅलीला विरोध होण्याची शक्यता?
प्रियंका यांनी येथील दुर्गाकुंड मंदिरात दर्शन घेतले आहे. त्यानंतर त्या आयोजीत शेतकरी रॅलीत सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर येथील प्रशासनाने मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली आहे. येथे प्रियंका यांच्या या शेतकरी रॅलीला विरोध होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर येथील प्रशासन अधिक खबरदारी घेत आहे. दरम्यान, येथील काही नेत्यांना नजरबंद करण्यात आले आहे.
जगतपुर इंटर कॉलेजच्या मैदानात प्रियंका यांची जनसभा
प्रियंका गांधी आज वाराणसीत शेतकरी न्याय रॅलीला संबोधित करणार आहेत. दरम्यान, त्या येथील काही मंदिरांनाही भेटी देणार आहेत. येथील जगतपूर मैदानावर हे प्रदर्शन होणार आहे. तेथे प्रियंका गांधी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत. प्रोटोकॉलनुसार प्रियंका गांधी सकाळी 11:10 वाजता वाराणसी विमानतळावर पोहचल्या. त्यानंतर 12:15 वाजता त्या मां कुष्मांडा देवी मंदिरात शीश नवाएंगी येथे दर्शन घेतील. त्यानंतर शेतकरी रॅलीसाठी त्या रवाना होणार आहेत. येथील रोहनिया परिसरातील जगतपुर इंटर कॉलेजच्या मैदानात प्रियंका यांची जनसभा आयोजीत करण्यात आली आहे. दरम्यान, येथे सुमारे एक लाख उपस्थित राहतील अशी माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा - lakhimpur case : लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी आशिष मिश्राला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी