ETV Bharat / bharat

गोव्यात घडामोडींना वेग, चेन्नईवरुन काँग्रेसचे पाच आमदार दाखल; दिगंबर कामतांना सदस्य पदावरुन हटवले - दिगंबर कामतांना सदस्य पदावरुन हटवले

सुरक्षेच्या कारणास्तव चेन्नईला रवाना झालेले काँग्रेसचे पाच आमदार रविवारी संध्याकाळी उशिरा गोव्यात परतले ( congress 5 mlas reach goa ) आहेत. तर, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना कायमस्वरूपी निमंत्रित सदस्य पदावरून हटवले ( Sonia Gandhi removes Digambar Kamat as permanent invitee to cwc ) आहे.

goa congress mla
goa congress mla
author img

By

Published : Jul 17, 2022, 10:21 PM IST

पणजी ( गोवा ) - सुरक्षेच्या कारणास्तव चेन्नईला रवाना झालेले काँग्रेसचे पाच आमदार रविवारी संध्याकाळी उशिरा गोव्यात परतले ( congress 5 mlas reach goa )आहेत. दरम्यान, हे पाचही आमदार सोमवारी ( 18 जुलै ) होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहभागी होणार आहेत. तर, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना कायमस्वरूपी निमंत्रित सदस्य पदावरून हटवले आहे. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. पक्षाविरोधात बंड केल्यामुळे ही कारवाई केल्याचं निवडणूक प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी ( Sonia Gandhi removes Digambar Kamat as permanent invitee to cwc ) सांगितलं.

काँग्रेसमध्ये दोन गट - तूर्तास काँग्रेसमध्ये दोन गट झाले आहेत. एक गट 18 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या बाजूने जाणार आहे. तर, दुसरा गट पक्षाशी एकनिष्ठ राहणार आहेत. त्यातच रविवारी ( 17 जुलै ) माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर केलेली कारवाई काँग्रेससाठी घातक ठरू शकते. कारण दिगंबर कामात यांच्या बाजूने असणारे पाच ते सहा आमदार भाजपला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करण्याची शक्यता वर्तवली जाते.

आमदार युरी आलेमाव यांची प्रतिक्रिया

आम्ही सगळे एकत्रच - आमच्यात कोणतीही गटबाजी नसून आम्ही पाच आमदार आमच्या वैयक्तिक कामासाठी चेन्नईला गेलो होतो. मात्र, माजी विरोधी पक्ष नेते माइकल लोबो यांनी मुंबईत कोणाची आणि कशासाठी भेट घेतली याबद्दल आपल्याला काही माहिती नसल्याचं चेन्नईतून परतलेले आमदार युरी आलेमाव यांनी म्हटलं.

विरोधी पक्ष नेत्यांनी घेतली भाजप पक्ष श्रेष्ठींची भेट - दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी शुक्रवारी अधिवेशनानंतर संध्याकाळी थेट मुंबई गाठत भाजप नेत्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसमधील एक गट भाजपच्या बाजूने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करणार असल्याच्या घटनांवर चर्चा केली. त्यातच दिगंबर कामत यांच्यावरील कारवाई हे भाजपसाठी एक अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. नाराज असलेल्या कामात यांच्यासह त्यांचे समर्थक आमदार भाजपच्या बाजूने सोमवारी मतदान करण्याची शक्यता आहे.

भाजपचा सावध पवित्रा - रविवारी काँग्रेस पक्षाने माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर कारवाई केल्यानंतर भाजपनेही सावध पवित्रा घेतला आहे. भाजपने आपल्या सर्व आमदारांची, खासदारांची व सहयोगी पक्षातील आमदारांची एक महत्त्वाची बैठक रविवारी संध्याकाळी पणजीत बोलावली होती. यावेळी राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात चर्चाही झाली.

हेही वाचा - शिवसेनेला मोठा धक्का बसणार?, कोल्हापुरातील दोन्ही खासदार 'जय महाराष्ट्र' करण्याच्या तयारीत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.