ETV Bharat / bharat

कल्याण सिंह यांच्या पार्थिववरील तिरंग्यावर भाजपाचा झेंडा; विरोधकांचा आक्षेप - SP question BJP for placing party flag over Indian flag

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचे पार्थिव अंतिम दर्शानासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांचे पार्थिव झाकलेल्या राष्ट्रध्वजावर भाजपाकडून आपला पक्ष झेंडा ठेवण्यात आला. यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय ध्वजावर एखाद्या पक्षाचा झेंडा ठेवणे योग्य आहे का, असा सवाल विरोधक करत आहेत.

Cong, SP question BJP for  placing party flag over Indian flag at Kalyan Singh's prayer meet
कल्याण सिंह यांच्या पार्थिववरील तिरंग्यावर भाजपाचा झेंडा; विरोधकांचा आक्षेप
author img

By

Published : Aug 23, 2021, 9:48 AM IST

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यांचे पार्थिव झाकण्यात आलेल्या राष्ट्रध्वजावर भाजपाचा झेंडा टाकण्यात आला होता. यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Cong, SP question BJP for  placing party flag over Indian flag at Kalyan Singh's prayer meet
भारतीय युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही यांचे टि्वट

भारतीय युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही यांनी रविवारी एक फोटो ट्विट केला आहे. ज्यामध्ये कल्याण सिंह यांचा मृतदेह हा राष्ट्रध्वजाने झाकलेला दिसतो. पण त्यातील अर्धा भाग भाजपा पक्षाच्या ध्वजाने झाकलेला दिसत आहे. न्यू इंडियात राष्ट्रीय ध्वजावर पक्षाचा झेंडा लावणे ठीक आहे का, असा सवाल श्रीनिवास बी. व्ही यांनी भाजपाला केला आहे. त्याच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर युजर्स भाजपाविरोधात रोष व्यक्त करत आहेत.

समाजवादी पक्षाचे प्रवक्ते घनश्याम तिवारी यांचे टि्वट

'भारत राष्ट्रध्वजाचा अपमान सहन करणार नाही', असे ट्विट युवक काँग्रेसने आपल्या अधिकृत हँडलवरून केले आहे. समाजवादी पक्षाचे प्रवक्ते घनश्याम तिवारी यांनीही फोटो ट्विट करत भाजपावर टीका केली. 'देशापेक्षा पक्ष मोठा. तिरंग्याच्यावर झेंडा. याचा भाजपाला नेहमीप्रमाणे: ना खेद, ना पश्चाताप, ना दु: ख, ना शोक, असे त्यांनी म्हटलं.

काँग्रेसचे टि्वट...

कल्याण सिंह यांचे शनिवारी निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लखनऊ गाठून त्यांना श्रद्धांजली वाहिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि बसपा (बहुजन समाज पार्टी) प्रमुख मायावती यांनीही कल्याण सिंह यांना श्रद्धांजली वाहिली. सिंह यांच्यावर अंतिम संस्कार 23 ऑगस्ट रोजी गंगेच्या काठावरील नरोरा येथे केले जातील. कल्याण सिंह राम मंदिर चळवळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक होते. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत बाबरी मशीद पाडली गेली. तेव्हा ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. या घटनेनंतर सिंह यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

हेही वाचा - इकडे कल्याण सिंह जेवत होते, तिकडे कारसेवक चढाई करत होते, नंतर...

हेही वाचा - कल्याण सिंह निधन, आज अंत्यसंस्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.