ETV Bharat / bharat

ऑनलाईन गेम खेळून मानसिक परिस्थिती बिघडली, 'हॅकर, पासवर्ड चेंज' म्हणत रस्त्यावर फिरत होता तरुण, उपचार सुरु

ऑनलाईन मोबाईल गेमच्या व्यसनामुळे ( Online Mobile Game Addiction ) राजस्थानच्या चित्तौडगड येथील एका तरुणाची मानसिक स्थिती ( Youth Condition Deteriorated In Chittorgarh ) बिघडली. हा तरुण मानसिकदृष्ठ्या विक्षिप्त झाल्यासारखं वागू लागला. ऑनलाईन गेमचा या तरुणावर इतका परिणाम झाला की तो रस्त्यावरच 'हॅकर आला' म्हणत पळू लागला. त्याच्या नातेवाईकांनी त्याला पकडून दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर श्री सांवलियाजी शासकीय हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन जात त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

ऑनलाईन गेम खेळून मानसिक परिस्थिती बिघडली, 'हॅकर, पासवर्ड चेंज' म्हणत रस्त्यावर फिरत होता तरुण, उपचार सुरु
ऑनलाईन गेम खेळून मानसिक परिस्थिती बिघडली, 'हॅकर, पासवर्ड चेंज' म्हणत रस्त्यावर फिरत होता तरुण, उपचार सुरु
author img

By

Published : Mar 26, 2022, 10:41 PM IST

चित्तोडगड ( राजस्थान ) : आजच्या डिजिटल युगात मोबाईल ही प्रत्येक सामान्य व विशेष व्यक्तीची गरज बनली आहे. लहान मुले काय, वडीलधारी मंडळी सर्वच मोबाईल वापरतात. त्यापैकी तरुण पिढी मोबाईलच्या संपर्कात सर्वाधिक आहे. ऑनलाइन गेमच्या जाळ्यात अडकून अनेक तरुण आपल्या जीवाशी खेळत आहेत. मोबाईलवर ऑनलाइन गेम खेळण्याचे व्यसन ( Online Mobile Game Addiction ) त्यांना इतके जडले आहे की ते मानसिक आजारी होत ( Youth Condition Deteriorated In Chittorgarh ) आहेत. ऑनलाइन गेममुळे अनेक तरुणांना जीव गमवावा लागला असून काहींनी मोठे गुन्हे केले आहेत. रात्रंदिवस गेम खेळल्याने अनेक तरुणांचे मेंदूचे संतुलनही हरवत आहे.

रात्री उशिरा गेम खेळल्याने परिणाम : असेच एक प्रकरण चित्तौडगड जिल्ह्यातील बनसेनमध्ये पाहायला मिळाले आहे. येथे ऑनलाइन गेमचे व्यसन लागलेल्या एका तरुणाने मानसिकदृष्ट्या खचल्यासारखे वर्तन सुरू केले आहे. 'हॅकर-हॅकर', 'पासवर्ड चेंज' वगैरे म्हणत तो रस्त्यावर धावतोय. तरूणाला दोरीने बांधावे लागण्याची स्थिती आली आहे. प्रकृती बिघडत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या तरुणावर मानसोपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. रात्री उशिरा मोबाइलवर गेम खेळल्याने आणि पुरेशी झोप न मिळाल्याने अशी समस्या उद्भवते, असे मानसोपचारतज्ज्ञ सांगतात.

ऑनलाईन गेम खेळून मानसिक परिस्थिती बिघडली, 'हॅकर, पासवर्ड चेंज' म्हणत रस्त्यावर फिरत होता तरुण, उपचार सुरु

बिहारमधून आला आहे हा तरुण: चित्तौडगड जिल्ह्यातील बनसेन भागात राहणाऱ्या इरफान अन्सारी याला ऑनलाइन मोबाइल गेम खेळण्याचे व्यसन असल्याचे समोर आले. तो पूर्वी बिहारच्या छपरा येथे राहत होता. काही दिवसांपूर्वी घरच्यांनी त्याला येथे बोलावले होते. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, इरफान तासनतास मोबाईलवर फ्री फायर गेम खेळत असे. त्याला मोबाईलवर गेम खेळण्याचे इतके व्यसन जडले होते की, फोन हिसकावला की त्याचा राग यायचा. गुरुवारी रात्रीही तो गेम खेळत असताना अचानक त्याचा मोबाइल बंद झाला. यानंतर रागाच्या भरात तो मानसिकदृष्ट्या खचल्यासारखे वागू लागला. तो वारंवार हॅकर आला - 'हॅकर आला', 'पासवर्ड चेंज', 'आयडी लॉक' असे शब्द बोलू लागला. त्याच्या या कृत्याने घरातील लोकही हैराण झाले आणि त्यांनी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. पण बराच वेळ तो विचित्र गोष्टी करत राहिला.

मित्रांनी पकडून बांधले खाटेवर : शुक्रवारी त्याने पुन्हा उदयपूर महामार्गावर वाहनचालकांना थांबवून 'आयडी हॅक' करण्याबाबत बोलण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याला पकडून खाटेवर दोरीने बांधले. याबाबत बनसेन ग्रामपंचायतीचे सरपंच कन्हैयालाल वैष्णव यांनी सांगितले की, मोबाईल खराब झाल्याने तरुणाची मानसिक स्थिती बिघडली. मोबाईल त्याच्या हातात होता. मात्र तरीही तो मोबाईल कोणीतरी चोरल्याचा आरोप करत होता.

पुरेशी झोपही झाली नाही : याबाबत श्री सांवलियाजी शासकीय रुग्णालयाचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेशकुमार स्वामी यांनी सांगितले की, या तरुणाला काल रात्री बारा वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांनी सांगितले की पुरेशी झोप न मिळाल्याने आणि बराच वेळ मोबाईल पाहिल्याने कधी कधी अशी परिस्थिती उद्भवते. सध्या या तरुणावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.