दुमका (झारखंड) - राज्याची उपराजधानी दुमकाच्या लकडजोरिया गावांत विकास ( Lakadjoria village marriage problem ) कामांचा अभाव आहे. त्यामुले येथील लोकांना गैरसोय तर होतच आहे, शिवाय यामुळे आता ग्रामस्थांना वैयक्तिक नुकसान देखील होत आहे. रस्ते, पाणी आणि इतर मूलभूत सुविधा गावात नसल्याने येथे लग्नाचा बार उडणे कठीण झाले आहे. विवाहासाठी मुलांना वाट ( Lakadjoria village no basic amenities ) पाहावी लागत आहे. असुविधेमुळे इतर गावांतील कुटुंबे आपल्या मुला मुलींचे लग्न या गावात जोडायला संकोच करत आहेत. त्यामुळे, तरुणांचे देखील नुकसान होत आहे. गावात आदिवासी बांधवांची ( drinking water Lakadjoria village) संख्या अधिक असून या गवांत 200 कुटुंब वास्तव्यास आहेत. गवाची एकूण लोकसंख्या 1200 इतकी आहे. हे गाव ज्या मतदारसंघात आहे त्याचे विधानसभेत प्रतिनिधत्व सध्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे वडील तथा माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांची सून सिता सोरोन करते. तरी देखील गावात विकास नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रस्ता आजतागायत बांधण्यात आलेला नाही - लकडजोरिया गावात जाण्यासाठी रस्ता आजतागायत बांधण्यात आलेला नाही. कच्चा रस्ता आहे. त्यातही खड्डे आहेत, दगड आहेत. गावातून आत जातानाच नाला दिसतो. या गावात दुसऱ्या वाहनाची चर्चा सोडा, ट्रॅक्टरही येत नाही, असे लोकांचे म्हणणे आहे. कोणी आजारी पडल्यास रस्त्याअभावी रुग्णवाहिका गावात पोहचू शकत नाही, अशी समस्या निर्माण होते. जे आजारी असतील त्यांना खाटेवर टांगून घेऊन जावे लागते.
गावात पाण्याची टंकी नाही - गावावर सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. लकडजोरिया गावांत 2 वर्षांपूर्वी बोरींग करून पाण्याची टांकी लावण्याचे काम सुरू झाले होते. बोरींग झाली, टांकी लावण्याचा स्टँड देखील झाला, मात्र अद्याप त्यावर टांकी बसवलेली नाही. गावात पाण्याची मोठी टंचाई, पाणी नसल्याने लोकांना गैरसोय होत आहे. तसेच गावाला सरकारी योजनांचा देखील लाभ मिळाला नसल्याचे पुढे आले आहे. पंतप्रधान आवास योजनेपासून वंचित असल्याचे गावकरी सांगतात. विद्यूत वाहिणी लावण्यात आल्या आहेत, मात्र घरात वीज जोडणी नाही, यामुळे विद्यार्थी आभ्यास कसे करणार? असा प्रश्न गावकरी करत आहेत.
लग्नास विलंब - गावात पोहचण्यासाठी रस्ता नाही, पाणी नाही, त्यामुळे गावातील लोक हैराण झाले आहेत, मात्र मजबुरीने त्यांना या गावात आयुष्य काढावे लागत आहे. या समस्याव्यतिरिक्त एक मोठी समस्या त्यांच्या पुढे उभी ठाकली आहे. इतर गावातील लोक लकडजोरिया गावात आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न करण्यास टाळाटाळ करतात. गावातील गुडित बाबूजी मुर्मू यांनी सांगितले की, या गरीब गावात कोणीही आपल्या मुलाचे आणि मुलीचे लवकर लग्न करू इच्छित नाही. इथल्या लोकांना लग्न करणं खूप अवघड आहे.
काय म्हणाले प्रशासनिक अधिकारी - या गावाच्या समस्येबाबत आम्ही दुमकाचे उपायुक्त आणि उपविकास आयुक्त या दोघांशी बोललो. कॅमेऱ्यासमोर ते काही बोलले नाही. मात्र, उपविकास आयुक्तांनी तात्काळ जामा ब्लॉकच्या बीडीओंना गावात जाऊन रस्त्याची समस्या, पाण्याची समस्या सांगा, अशा सूचना दिल्या.