ETV Bharat / bharat

मुझफ्फरपूरमध्ये राकेश टिकैतविरुद्ध खटला दाखल; आठ एप्रिलला सुनावणी

author img

By

Published : Apr 2, 2021, 8:34 AM IST

राजस्थानमधील किसान महापंचायतीवेळी राकेश टिकैत यांनी सरकारला धमकावले होते. केंद्राने लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द केले नाहीत, तर १६ राज्यांमधील लोकांना वीज मिळणार नाही, असे टिकैत म्हणाले होते. यामुळे आपण त्यांच्याविरोधात खटला दाखल केल्याचे या वकिलाने म्हटले आहे...

Complaint filed against Rakesh Tikait in Muzaffarpur court
मुझफ्फरपूरमध्ये राकेश टिकैतविरुद्ध खटला दाखल; आठ एप्रिलला सुनावणी

पाटणा : बिहारच्या मुझफ्फरपूर न्यायालयात भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. राजस्थानमध्ये झालेल्या किसान महापंचायतीनंतर एका वकीलाने दिलेल्या तक्रारीवरुन हा खटला दाखल केला आहे.

सुधीर ओझा असे या वकीलाचे नाव आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम ५०४,५०६,१५३अ आणि १६० अंतर्गत टिकैत यांच्यावर हा खटला दाखल करण्यात आला आहे. राजस्थानमधील किसान महापंचायतीवेळी राकेश टिकैत यांनी सरकारला धमकावले होते. केंद्राने लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द केले नाहीत, तर १६ राज्यांमधील लोकांना वीज मिळणार नाही, असे टिकैत म्हणाले होते. यामुळे आपण त्यांच्याविरोधात खटला दाखल केल्याचे या वकिलाने म्हटले आहे.

याबाबत ८ एप्रिलला सुनावणी होणार असल्याची माहिती न्यायालयाने दिली.

हेही वाचा : खुर्चीसाठी कायपण! पंचायत निवडणुकांसाठी ४५व्या वर्षी ब्रह्मचर्य तोडत केलं लग्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.