ETV Bharat / bharat

Crime News : व्हॅलेंटाईन डेला गिफ्ट देण्यासाठी पैसे नव्हते म्हणून या पठ्ठ्याने चोरल्या बकऱ्या

प्रेयसीला भेट देण्यासाठी म्हणून बकरी चोरणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेयसीला भेटवस्तू घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे विद्यार्थ्याने बकरी चोरून ती विकून भेटवस्तू खरेदी करण्याचा बेत आखला होता.

College student arrested for stealing goat
बकरी चोरी
author img

By

Published : Feb 14, 2023, 2:18 PM IST

विल्लुपुरम (तामिळनाडू) : पैशांची चणचण भासणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणाने आपल्या मैत्रिणीला महागडे व्हॅलेंटाइन गिफ्ट देण्यासाठी बकरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. ही चोरी करताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हा तरुण ती चोरलेली बकरी विकून त्या पैशातून आपल्या मैत्रीणीला व्हॅलेंटाईन गिफ्ट देणार होता. या चोरीत त्याला मदत करणाऱ्या त्याच्या मित्राला देखील पोलिसांनी अटक केली आहे. व्हॅलेंटाइन डेच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली आहे. जगभरात 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जोडप्यांनी भेटवस्तूंची देवाणघेवाण करण्याची प्रथा आहे. त्यामुळे आपल्या मैत्रिणीला खूश करण्याच्या प्रयत्नात त्याने हे कृत्य केले.

शेजाऱ्यांनी पकडून दिले : विल्लुपुरम पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिला ही विल्लुपुरम जिल्ह्यातील पीरंगिमेडू मलयारासन कुप्पा येथील रहिवासी आहे. ती तिच्या घरामागील शेडमध्ये शेळ्या पाळते. त्या दिवशी दोन तरुण तिच्या घराजवळ आले आणि त्यांनी तिचा बकरा हिसकावून दुचाकीवरून पळ काढला. बकऱ्या ओरडण्याचा आवाज ऐकून महिला बाहेर आली आणि तिने आरडाओरडा चालू केला. आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी तरुणाला घेरले. त्यानंतर त्यांनी तरुणांना मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरी करणारा तरुण एका तरुणीच्या प्रेमात आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तिच्यासाठी भेटवस्तू घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे त्याने एक बकरी चोरून ती विकून भेटवस्तू खरेदी करण्याचा बेत आखला, अशी माहिती पोलिसांनी दिली. अलीकडे या आजूबाजूच्या परिसरात बकऱ्या चोरीच्या घटना वाढत असून, या घटनांमध्ये देखील अटक करण्यात आलेल्या दोघा तरुणांचा हात आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.

व्हॅलेन्टाईन डे साठी गोल्ड प्लेटेड गुलाब गिफ्ट : व्हॅलेन्टाईन डे साजरा करण्यासाठी सूरतच्या तरुणीने आपल्या पतीला सोन्याचा मुलामा असलेल्या हृदयाच्या आकाराचे गुलाब गुच्छ व्हॅलेन्टाईन गिफ्ट म्हणून दिले आहे. या गुच्छात 108 सोन्याचे प्लेटेड गुलाब आहेत. 108 ही संख्या पती पत्नीत एकता दर्शवत असल्याचे पत्नीने यावेळी सांगितले. 108 या संख्येमुळे पती-पत्नीमध्ये प्रेम वाढून ते कायमचे एक होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सोन्याच्या एका गुलाबाची किंमत 1700 रुपये असून या गुलाब पुष्पाची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. गुलाब पुष्प काही वेळाने कोमेजून जाते, मात्र सोनेरी गुलाबासारखे त्यांचे नाते कायम टिकून राहण्यासाठी हे गिफ्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा : Railway Job By False Documents : खोटी कागदपत्रे तयार करून मिळवली रेल्वेत नोकरी, तब्बल ३२ वर्षांनंतर प्रकरण उघडकीस!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.