थेनी : तामिळनाडूमधील मदुराई उच्च न्यायालयाने ( Madras High Court ) पोंगल सणाला ( Pongal Fesival ) काही नियमांसह कोंबड्यांच्या झुंजी आयोजित करण्यास परवानगी दिली आहे. कोंबड्याच्या पायात ब्लेड किंवा चाकू बांधू नये, असेही यावेळेस स्पष्ट करण्यात आले आहे.
तामिळनाडूमधील उथमपालयम येथील रहिवासी असलेल्या थांगमुथूने पोंगल सण (Pongal Fesival) साजरा करण्यासाठी कोंबडीच्या पायाला (Rooster Fights) ब्लेड न बांधता लढण्याची परवानगी मिळावी यासाठी मदुराई उच्च न्यायालयात ( Madras High Court ) याचिका दाखल केली आहे. यात तामिळनाडू सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे आणि खबरदारीचे पालन केले जाईल, असे याचिकेत म्हटले आहे.
का म्हटले याचिकेत ?
यासोबतच १६ जानेवारीला कोंबड्यांची झुंज (Rooster Fights) आयोजित करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी मागितली आहे, असेही याचिकेत म्हटले आहे. कोंबड्याच्या झुंजीसाठी न्यायालयाचा आदेश अनिवार्य आहे. त्यामुळे 16 जानेवारीला उथमपालयम (Uthamapalayam) येथे कोंबड्यांची झुंज आयोजित करण्याची परवानगी द्यावी, असेही याचिकाकर्त्याने सांगितले आहे.
कोंबड्यांच्या पायाला चाकू न बांधण्याची परवानगी
न्यायाधीश जीआर स्वामीनाथन (Justice G R Swaminathan) यांच्यासमोर झालेल्या चौकशीत ही याचिका आली. सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी सांगितले की, कोंबडीच्या पायात ब्लेड किंवा चाकू बांधू नये. कोणत्याही कोंबड्याला मारण्यासाठी मारामारी करू नये. दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 जानेवारीला कोंबड्यांची झुंज (Cock Fight) आयोजित करण्याची परवानगी दिली आहे.