लखनऊ ( उत्तर प्रदेश ) : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत ( UP Cabinet Meeting )मोठा निर्णय घेतला ( CM Yogi Adityanath Big Decision ) आहे. मंत्रिपरिषदेच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी 15 कोटी गरीब लाभार्थ्यांना तीन महिन्यांसाठी मोफत रेशन देण्याची घोषणा केली ( Free Ration For Three Months ) आहे. या योजनेची मुदत तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. म्हणजेच अंत्योदय कार्डधारकांना एप्रिल, मे आणि जून महिन्यापर्यंत मोफत रेशन दिले जाईल.
मार्चअखेरपर्यंत होती मुदत : या निर्णयाची माहिती प्रसारमाध्यमांना देताना मुख्यमंत्री म्हणाले की, नव्याने आलेल्या सरकारने मोफत रेशन योजनेत तीन महिन्यांसाठी वाढ करण्याचा पहिला निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या काळात प्रधानमंत्री अन्न योजना सुरू झाली. देशातील 80 कोटी लोकांना त्याचा लाभ मिळत होता. अन्नधान्याबरोबरच डाळींची पाकिटे आणि मीठ, साखर आदीही देण्यात येत होते. यापूर्वी ही योजना मार्च २०२२ पर्यंत होती. आता पुढील 3 महिने राज्यातील 15 कोटी जनतेला याचा लाभ मिळत राहणार आहे.
माध्यमांशी साधला संवाद : शुक्रवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शनिवारी मुख्यमंत्री योगी यांची ही पहिलीच कॅबिनेट बैठक होती. दरम्यान, मोफत रेशन योजनेचा कालावधी वाढवण्याचा पहिला निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक आणि कॅबिनेट मंत्री स्वतंत्र देव सिंह आणि सुरेश खन्ना उपस्थित होते.