अहमदाबाद - गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांकडे त्यांनी आपला राजीनामा सोपविला आहे. रुपाणी यांच्या अचानक राजीनाम्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे त्यांनी त्यांचा राजीनामा सोपविला आहे. उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि इतर वरिष्ठ मंत्र्यांसह राज्यपालांच्या घरी जाऊन त्यांनी आपला राजीनामा त्यांच्याकडे सोपविला. भाजपचे संघटनात्मक सरचिटणीस रत्नाकर तसेच भाजपचे राज्य प्रभारी भूपेंद्र यादवही यावेळी त्यांच्यासोबत होते.
रुपाणी यांनी भाजपचे मानले आभार-
गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या परिस्थितीमुळे रुपाणी यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर रुपाणी यांनी माध्यमांशी संवाद साधला. विजय रुपाणी म्हणाले, की गुजरातच्या लोकांची सेवा करण्याची संधी भाजपने दिली. त्याबद्दल भाजपचा आभारी आहे. ज्या प्रमाणे जबाबदारी दिली जाईल, त्याप्रमाणे पक्षाचे आणि संघटनेचे काम करणार असल्याचे रुपाणी यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा-Mumbai Nirbhaya Case : घटना निंदनीय, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत हे तीन नावे आली चर्चेत...
गुजरातचे मुख्यमंत्री कोण होणार, याबाबतची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. सुत्राच्या माहितीनुसार एक ते दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्रिपदाची निवड एक ते दोन दिवसांमध्ये होऊ शकते. सुत्राच्या माहितीनुसार सध्याचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला आणि मनसुख मांडवीय हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. तिन्ही नेते पाटीदार समाजातील मोठे नेते आहेत.
हेही वाचा-अति रक्तस्त्रावामुळे मृत्यू, आरोपीवर पोलीस योग्य कारवाई करतील - पेडणेकर