ETV Bharat / bharat

Mamata Banerjee : धक्कादायक.. ममता बॅनर्जींच्या घरी घुसखोरी..अटक केलेल्या आरोपीने फोटो काढून पाठवले बांग्लादेशात.. - CM Mamata Banerjee

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घरात घुसखोरी केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली ( Hafizul Arrested In Mamata Residence Trespassing ) आहे. या घुसखोराने बांगलादेशी सिमकार्डस वापरून ममतांच्या घरात घुसखोरी केल्यानंतर अनेक फोटो बांग्लादेशात पाठवल्याचे चौकशीत समोर आले आहे.( Man Arrested With Bangladeshi Sim Cards )

Mamata Banerjee
ममता बॅनर्जी
author img

By

Published : Jul 14, 2022, 11:16 AM IST

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घरात घुसखोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या हाफिझुल मोल्लाची ( Hafizul Arrested In Mamata Residence Trespassing ) चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आणखी खळबळजनक माहिती मिळवली आहे. हफिझुल मोल्लाने अनेक बांगलादेशी सिमकार्ड वापरल्याचे ( Man Arrested With Bangladeshi Sim Cards ) कळते. पण त्या सिमकार्डचा वापर करून तो नियमित कोणाच्या संपर्कात होता हे मात्र अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही.

एसआयटीकडून तपास सुरु : कोलकाता पोलिस मुख्यालय लालबाजारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची काही छायाचित्रे बांगलादेशातील अनेक लोकांना दिली. कोलकाता पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) या संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून तपासत आहेत की, बांगलादेशातील कोणत्या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशी हाफिजुलचे काही संबंध आहेत का?

लोखंडी रॉडही केलाय जप्त : उत्तर 24 परगनामधील बशीरहाट येथील रहिवासी असलेल्या हाफिझुल मोल्लाला नुकतेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील निवासस्थानातून पकडण्यात आले होते. त्याच्याकडून एक लोखंडी रॉड जप्त करण्यात आला. त्यानंतर कोलकाता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

अनेकदा ममतांच्या घरी भेट : एसआयटीच्या तपास अधिकाऱ्यांना असे समजले की हफिजुलने त्याला पकडण्यापूर्वी अनेकवेळा मुख्यमंत्र्यांच्या घरी भेट दिली होती. हफिझुल मोल्लाने तिथले अनेक फोटो काढले आणि शेजारच्या बांगलादेशातील वेगवेगळ्या लोकांना दिले. मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केल्यानंतर अधिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

हेही वाचा : Mamata Banerjee : एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू जिंकू शकतात राष्ट्रपतीपदाची निवडणूक.. ममतांनी स्पष्टच सांगितलं..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.