पणजी - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamta Banerjee In Goa) काल सायंकाळी गोव्यात दाखल झाल्या असून गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Goa Internation Airport) त्यांचे स्वागत करण्यता आले. पुढचे दोन दिवस ममता बॅनर्जी या गोव्यात असून उद्या तृणमुल काँग्रेस (TMC) गोवा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची (TMC Candidate List For Goa Assembly Election) यादी घोषित करण्याची शक्यता आहे.
आज करणार युतीची घोषणा -
तृणमूल काँग्रेसने अधिकृतपणे गोव्यातील महाराष्ट्र गोमंतक पक्षाशी युती केली आहे. त्याची अधिकृत घोषणा ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर आणि दीपक ढवळीकर यांच्या उपस्थितीत गोवा इंटरनॅशनल सेंटरमध्ये (Goa Internation Center) करणार आहेत. महाराष्ट्र गोमंतक पक्षाने (Maharashtra Gomantak Party) तृणमुल काँग्रेसकडे 12 जागांची मागणी केली आहे. मात्र, त्यांच्या पदरात अवघ्या 8 जागा पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
उमेदवारांची यादी आज घोषित -
तृणमूल काँग्रेसने जरी महाराष्ट्र गोमंतक पक्षाशी युती केली. तरी 40 मतदारसंघात आपल्या प्रचाराचे काम सुरू केले आहे. राज्यात पक्ष नवीन असल्यामुळे सर्वच नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. मात्र, महाराष्ट्र गोमंतक पक्षाच्या वाट्याला त्यांच्या जागा दिल्यावर उर्वरित मतदारसंघातील उमेदवारांची यादी घोषित करणार आहे.
अनुभवी नेत्यांची फौज तृणमूलच्या ताफ्यात -
राज्यात पक्ष नवीन असला तरी तृणमुल सोबत राज्यातील अनुभवी नेते तृणमुल पक्षासोबत आहेत. यात माजी मुख्यमंत्री लुईझींनो फलेरो, माजी मुख्यमंत्री व आमदार चर्चिल अलेमाव, माजी आमदार किरण कंडोळकर, कविता कंडोळकर यांच्या सोबत आजी माजी आमदार तसेच अनेक अनुभवी कार्यकर्त्यांची फौज आहे.
हेही वाचा - MHADA Paper Leak Case : पेपर फोडणाऱ्या 6 आरोपींना अटक; 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी